फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
KKR vs RCB Live Streaming : आयपीएल २०२५ ची सुरुवात शनिवार, २२ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. केकेआर विरुद्ध आरसीबी सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे, परंतु उद्घाटन समारंभामुळे सामना सुरू होण्यास थोडा विलंब होऊ शकतो. यावेळी भारतीय चाहते आयपीएलचा मोफत आनंद घेऊ शकणार नाहीत, त्यांना आयपीएल पाहण्यासाठी किंमत मोजावी लागेल.
मोहम्मद शामीची मागणी पूर्ण, आयपीएलमध्ये ‘जुना’ नियम परत आला, आता मैदानावर फक्त गोलंदाजांची चालणार
आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या २ वर्षांपासून चाहत्यांनी जिओ सिनेमावर या रंगीत लीगचा पूर्णपणे मोफत आनंद घेतला आहे. आयपीएल २०२५ च्या सुरुवातीच्या केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्याशी संबंधित काही महत्वाच्या माहितीवर एक नजर टाकूया-
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल २०२५ चा पहिला सामना शनिवार, २२ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी अर्धा तास आधी मैदानात उतरतील.
भारतीय चाहते केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ चा पहिला सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तसेच स्पोर्ट्स १८ च्या विविध चॅनेलवर टीव्हीवर पाहू शकतात.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल २०२५ चा पहिला सामना जिओहॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल, परंतु यावेळी स्ट्रीमिंग मोफत असणार नाही. चाहत्यांना ऑनलाइन सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागेल. याशिवाय, जिओने १०० रुपयांचा प्लॅन देखील लाँच केला आहे ज्यामध्ये वापरकर्त्यांना तीन महिन्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळेल.
आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ३४ वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये केकेआरने २० सामने जिंकले आहेत आणि आरसीबीने १४ सामने जिंकले आहेत. पुढचा सामना केकेआरच्या घरच्या मैदानावर होणार आहे, त्यामुळे त्यांना आघाडी वाढवण्याची संधी असेल.