सौजन्य - rohitsharma45 भारतीय कर्णधाराचे भवितव्य टांगणीला; खरोखर रोहित घेणार का निवृत्ती? ....पण हिटमॅनला पर्याय कोण
Rohit Sharma Retirement : भारतीय संघाची फलंदाजी मागील अनेक दिवसांपासून सुमार दर्जाची पाहायला मिळत आहे. असं वाटू लागलेय भारतीय खेळाडू डिफेन्सच विसरून गेलेत. आता खरोखर, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, महान सचिनची आठवण आल्याशिवाय राहत नाही. न्यूझीलंडचा भारत दौऱ्यात टीम इंडियाने घरच्या मैदानावर सिरीज गमावली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आणून दिलेला सामना ते फलंदाज स्वतःच्या चुकीने गमावत आहेत. यामध्ये भारतीय संघाच कर्णधारसुद्धा सर्वच आघाड्यांवर अपयशी होताना दिसत आहे.रोहितच्या निवृत्तीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत, पण हे विसरून चालणार नाही की, याचा कर्णधाराने टी-20 चा विश्वचषक भारताला मिळवून दिला आहे.