सर्वेश कुशारेने जिंकले रौप्य पदक (फोटो- ians)
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या सर्वेश कुशारेने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. सर्वेश कुशारेने तब्बल 2.25 मीटर हाय जंप मारत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. पुरुषांच्या हाय जंपच्या अंतिम फेरीत सर्वेशने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले होते, या ऐतिहासिक कामगिरीनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोशल मिडियावर पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे.
हाय जंप प्रकारात सर्वेशने सुरुवातीपासून आपले वर्चस्व ठेवले होते. 2.05 मीटर, 2.10 मीटर आणि 2.15 व 2.20 मीटर प्रकारात पहिल्याच उडीमध्ये यश प्राप्त केले. त्यानंतर त्याने 2.25 मीटरच्या प्रकारात तिसऱ्या उडीमध्ये यश मिळवले आणि रौप्य पदक आपल्या नावावर केले. यानंतर २.२८ मीटरच्या उंचीसाठी सर्वेश आणि जमैकाच्या रोमेन बेकफोर्डमध्ये लढाई झाली. मात्र दोघांना हा टप्पा पूर्ण करता आला नाही. मात्र, २.२५ मीटरची उडी पहिल्याच प्रयत्नात पूर्ण केल्यामुळे जमैकाच्या रोमेन बेकफोर्डला सुवर्णपदक मिळाले, तर सर्वेशला कौंटबॅक नियमानुसार रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या जॅक किमानीने २.२० मीटरसह कांस्य पदक पटकावले.
काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु?
सर्वेश कुशारेचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! त्याची ही जिद्द आणि उत्कृष्ट कामगिरी देशातील लाखो तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल.
Hearty congratulations to Sarvesh Anil Kushare for clinching the Silver Medal in the Men’s High Jump event at the Glasgow Commonwealth Games 2026. With your excellent performance, you have made India proud. My best wishes to you for many more inspiring feats. — President of India (@rashtrapatibhvn) July 28, 2026
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्राचा सुपुत्र सर्वेश कुशारे याने ग्लास्गो CWG 2026 मध्ये हाय जंपमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. शेतकरी कुटुंबातील या तरुणाचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातर्फे त्याचे मनःपूर्वक अभिनंदन
🥇🥈🇮🇳 Heartiest congratulations to Sharmila Dhankar on becoming India’s first-ever Commonwealth Games Gold medallist in Para Athletics by winning the Women’s Shot Put F57 and to Sarvesh Kushare on winning the Silver Medal in the Men’s High Jump at the Commonwealth Games.… pic.twitter.com/k6csSZHQJ0 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2026






