पंजाबच्या पराभवावर श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मिडिया)
आयपीएल 2026 मध्ये पंजाब किंग्जजा पहिला पराभव
श्रेयस अय्यरने गोलंदाजांवर फोडले खापर
राजस्थानच्या मिडल ऑर्डरचे केले कौतुक
Tata IPL 2026 Shreyas Iyer On PBKS Loss: काल चंदीगडमध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अजिंक्य असलेल्या पंजाब किंग्जचा पराभव केला आहे. यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जचा हा पहिला पराभव झाला आहे. पराभव झाल्यावर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रतिक्रिया दिली आहे.
पंजाब किंग्जचा यंदाच्या हंगामातील पहिला पराभव झाला आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने यावर भाष्य केले आहे. फिल्डिंगमध्ये झालेल्या लहान लहान चुका आणि शेवटच्या ओव्हर्समधील गोलंदाजी यामुळे आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. श्रेयस अय्यर म्हणाला, “पंजाब किंग्जने सुरुवातीला चांगली पकड घेतली होती. मात्र शेवटच्या ओव्हर्समध्ये पंजाबच्या गोलंदाजांनी रन्स जास्त प्रमाणात दिल्यामुळे आणि महत्वाच्या क्षणी सुटलेले कॅच आम्हाला महागात पडले. मोठ्या स्पर्धेत अशा लहान लहान चुका विजयापासून दूर नेतात.”






