फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Quinton de Kock Back : दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मागील काही महिन्यामध्ये कमालीची कामगिरी केली आहे. संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये चॅम्पियन झाले. त्यानंतर इंग्लडच्या संघाला देखील मालिकेमध्ये पराभूत केले होते. आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या एका स्टार खेळाडूने यू-टर्न घेतला आहे. याचा अर्थ त्याने आपली निवृत्ती मागे घेतली आहे.
तो पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास तयार आहे. तो पुढील महिन्यात होणाऱ्या संघाच्या पाकिस्तान दौऱ्याचाही भाग असेल. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर या खेळाडूने या फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतली आहे. २०२३ च्या विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा करणारा डी कॉक पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये परतण्याची अपेक्षा आहे.
🚨 𝑩𝑹𝑬𝑨𝑲𝑰𝑵𝑮 🚨
Quinton de Kock has reversed his ODI retirement and has been named in South Africa’s T20 and ODI squads for their upcoming tour of Pakistan. 🇿🇦🙌🏼#PAKvSA #QuintonDeKock #SouthAfrica #Sportskeeda pic.twitter.com/7ZlgZXzTQd
— Sportskeeda (@Sportskeeda) September 22, 2025
ESPNcricinfo च्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने (CSA) पाकिस्तान दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि टी-२० संघात क्विंटन डी कॉकचा समावेश केला आहे, जो एक मोठा धक्का आहे. दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले, “क्विंटनचे पांढऱ्या चेंडूच्या संघात पुनरागमन ही आमच्यासाठी एक मोठी कामगिरी आहे. गेल्या महिन्यात जेव्हा आम्ही त्याच्या भविष्याबद्दल चर्चा केली तेव्हा हे स्पष्ट झाले की त्याच्याकडे अजूनही त्याच्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची तीव्र महत्त्वाकांक्षा आहे. तो संघात कोणते गुण आणतो हे सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या पुनरागमनाचा फायदा संघालाच होईल.”
क्विंटन डी कॉक गेल्या वर्षभरापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने शेवटचा टी-२० सामना २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळला होता. शिवाय, तो आधीच कसोटी स्वरूपातून निवृत्त झाला आहे. त्याने २०२१ मध्ये कसोटी स्वरूपाचा निरोप घेतला.
डेव्हिड मिलर (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, न्काबा पीटरसन, लुआन-ड्रे प्रिटोरियस, एंडिले विलियम्सा, ली विल्यम्स, ली.
मॅथ्यू ब्रेट्झके (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, डोनोव्हन फेरेरा, ब्योर्न फॉर्च्युइन, जॉर्ज लिंडे, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, न्काबा पीटर्स, लुआन-शीब ड्रेय, लुआन-शीब ड्रेय.