IND vs AUS : रोहित शर्माच 'सिक्सर किंग'; ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचला इतिहास(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
IND vs AUS : आज दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया समोर समोर भिडले आहेत. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स केरी या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 265 धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केली. परंतु, भारताची सुरवात निराशाजनक झाली. गिलच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. तो 8 धावा करून बाद झाला. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली आहे. त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे.
रोहित शर्माला गेलचा विक्रम मागे टाकण्यासाठी उपांत्य फेरीत फक्त एका षटकाराची गरज होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत वेगवान गोलंदाज नॅथन एलिसच्या चेंडूवर षटकार लगावत रेकॉर्ड रचला आहे. रोहित शर्माचे आयसीसीच्या स्पर्धेत सर्वाधिक 65 षटकार झाले आहेत. गेलला मागे टाकण्यासाठी रोहित शर्माला एका षटकाराची गरज होती. त्याने क्रिस गेलला मागे टाकेल आहे.
हेही वाचा : IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 265 धावांचे आव्हान; स्टीव्ह स्मिथ चमकला, मोहम्मद शमीचा प्रभावी मारा…
रोहित शर्मा आता आयसीसीच्या एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत गेल दुसऱ्या स्थानावर गेला असून रोहितने पहिलं स्थान प्राप्त केलं आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 48 षटकार लगावले आहेत.
आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील रोहित शर्माचा हा ४२ वा सामना खेळत आहे. या कालावधीत त्याने 8 शतकांसह 10 अर्धशतके ठोकली आहेत. रोहितने आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत 65 षटकार आणि 231 चौकार मारले आहेत. रोहित शर्माने उपांत्य फेरीत 29 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा केल्या आहेत. त्याला पार्ट टाइम गोलंदाज कूपर कॉनली माघारी पाठवले.
टीम इंडियाच्या डावाची सुरुवात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुभमन गिल या सलामीवीरांनी केली. परंतु, भारताची सुरवात खराब झाली. गिल 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर लयीत असणारा रोहित शर्मा 29 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकारासह 28 धावा करून कूपर कॉनलीकहा शिकार ठरला. गिलनंतर आलेला विराट कोहली 64 धावांवर खेळत आहे. तर श्रेयस अय्यर 62 चेंडूमध्ये 45 धावा करून बाद झाला. त्याला अॅडम झांपाने तंबूत पाठवले. भारताने 164 धावा केल्या असून 3 विकेट्स गामावल्या आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा