फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
RR vs GT Toss Update : राजस्थान रॉयल्सचा संघ आज त्यांच्या घरच्या मैदानावर सवाई मानसिंह स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सशी सामना होणार आहे. आजचा सामना गुजरात टायटन्सच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. संघाला आज पहिल्या स्थानावर जाण्याची संधी असणार आहे. जर राजस्थान रॉयल्सच्या संघाला त्यांचा खेळ सुधारण्याची संधी मिळणार आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या फलंदाजीवर चाहत्यांची नजर असणार आहे. दोघे सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत.
राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये आज एक बदल करण्यात आला आहे. आजच्या सामन्यात तुषार देशपांडे याला संघाबाहेर ठेवले आहे. त्याच्या जागेवर युद्धवीर सिंग याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे. मागील काही सामन्यात तुषार देशपांडे याने चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे आज या पदार्पण करण्याऱ्या गोलंदाजांवर चाहत्यांचे लक्ष्य असेल. गुजरातच्या संघामध्ये देखील एक बदल करण्यात आला आहे, यामध्ये इशांत शर्माला प्लेइंग ११ मधून बाहेर काढले आहे आणि त्यांच्या जागेवर अफगाणिस्तानचा करीम जन्नतला संघामध्ये स्थान मिळाले आहे.
🚨 Toss 🚨@rajasthanroyals won the toss and opted to field first against @gujarat_titans.
Updates ▶ https://t.co/HvqSuGgTlN#TATAIPL | #RRvGT pic.twitter.com/Es2Tkr64WT
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2025
गुजरात टायटन्सची सलामीवीर जोडी शुभमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी राजस्थान रॉयल्ससाठी घातक ठरू शकते. दोन्ही फलंदाज दमदार फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर जोस बटलर सुद्धा सध्या कमालीचा खेळ दाखवत आहे. आज राजस्थानच्या फलंदाजीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे संघाने या सीझनमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. रियान परागच्या बॅटमधून या सीझनमध्ये कमी धावा आल्या आहेत तर दुसरीकडे गुजरात टायटन्सची फलंदाजी देखील मजबूत आहे.
रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), सिमरन हेटमायर, वनिंदूं हंसरंगा, जोफ्रा आर्चर, महिष तिक्षणा, संदीप शर्मा, युद्धवीर सिंग
इम्पॅक्ट प्लेयर – शुभम दुबे, तुषार देशपांडे, कार्तिकेय सिंह, आकाश माधवला, कुणाल राठोड
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकिपर), वाशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतीया, करीम जन्नत, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इम्पॅक्ट प्लेयर – इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, अर्शद खान, दशुन शनका