SA vs NZ : न्यूझीलंडचा द. आफ्रिकेसमोर 362 धावांचा डोंगर; रचीन रवींद्रसह केन विल्यमसनची दमदार शतके..(फोटो सौजन्य; सोशल मीडिया)
SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामना आज (5 मार्च) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने 362 धावांपर्यंत मजल मारली असून दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी 363 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे.
कर्णधार मिचेल सँटनरचा प्रथम फलंदाजीचा निर्णय रचीन रवींद्रसह केन विल्यमसन या जोडीने योग्य ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रचीनने 108 तर विल्यमसनने 102 धावा केल्या. या दोघांच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेने धावांचे आव्हान दिले. द. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीन आणि कसिगो रबडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफी सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यात रचीन रवींद्रने शतकी खेळी केली आहे. त्याने 101 चेंडूमध्ये 108 धावा केल्या आहेत. त्याला कासिगो रबडाने आऊट केले. तर केन विल्यमसनने 94 चेंडूचा सामना करत 102 धावा केल्या आहेत. त्याला विआन मुल्डरने माघारी पाठवले. तसेच सलामीला आलेला विल यंग मात्र लयीत दिसत असतानाच त्याला लुंगी एनगिडीने बाहेरचा रस्ता दाखवला.
डॅरिल मिशेलने फटकेबाजी करत 37 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी केली. त्याला लुंगी एनगिडीने तंबूत पाठविले. तर टॉम लॅथम रबडाच्या चेंडूवर स्वस्तात बाद झाला. त्याने केवळ 4 धावाच केल्या. त्यांतर आलेला ग्लेन फिलिप्स 27 चेंडूमध्ये 49 धावांची ताबडतोब फलंदाजी करत नाबाद राहिला. तर मायकेल ब्रासवेलने 16 धावांची भर घातली आणि मिचेल सँटनर 2 धावा करत नाबाद राहीला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीन सर्वाधिक 3 विकेट्स तर कसिगो रबडा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच विआन मुल्डरने एक विकेट्स घेतली. केशव महाराजला मात्र बळी टिपण्यात अपयश आले.
लाहोर मधील गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात विल्यमसनला 27 धावांची गरज होती आणि केशव महाराजने टाकलेल्या सामन्याच्या 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने हा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विल्यमसन हा क्रिकेट जगातील 16 वा फलंदाज ठरला आहे. केन विल्यमसनने आपल्या 384व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि 440व्या डावात 19 हजार धावांचा आकडा गाठला आहे.
रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, लुंगी एनगिडी
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, मायकेल ब्रासवेल