फोटो सौजन्य - IndianPremierLeague
KKR vs GT 1st innings : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सध्या ऐतिहासिक मैदान ईडन गार्डन्सवर सामना सुरु आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पहिले गुजरात टायटन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत कोलकाता नाईट राइडर्ससमोर 199 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यांमध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी अर्धशतक झळकावले. आजच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाने मजबूत फलंदाजी केली होती. गुजरात टायटन्सच्या संघाने आज पहिला विकेट १३ व्या ओव्हरमध्ये गमावला होता. तर दुसरीकडे कोलकाताच्या गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली.
आजच्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सचे सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन आणि संघाचा कर्णधार शुभमन गिल यांनी संघासाठी धमाकेदार फलंदाजी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. आजच्या सामन्यात साई सुदर्शनने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. यामध्ये त्यांनी १ षटकार आणि ६ चौकार मारले. शुभमन गिलने संघासाठी आज दमदार खेळी खेळली, त्याने आज ५५ चेंडूंमध्ये ९० धावा केल्या. यामध्ये त्याने ३ षटकार आणि १० चौकार मारले. आज या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची खेळी खेळली.
Innings Break!
Batting brilliance from the dynamic trio of Shubman Gill, Sai Sudharsan, and Jos Buttler powers #GT to 1⃣9⃣8⃣ / 3⃣ 💥
A mega chase incoming from #KKR? 🤔
Updates ▶ https://t.co/TwaiwD5D6n#TATAIPL | #KKRvGT | @gujarat_titans pic.twitter.com/nc2SUIVrNM
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2025
शुभमन गिलचा विकेट गेल्यानंतर राहुल तेवतीया फलंदाजीसाठी आला होता पण तो संघासाठी विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने दोन चेंडू खेळले आणि हर्षित राणाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. जोस बटलरने मागील सामन्यांमध्ये ९७ धावांची खेळी खेळली होती. आज त्यानं २३ चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये त्याने ८ चौकार मारले. शाहरुख खान काही शेवटच्या चेंडू शिल्लक असताना फलंदाजीसाठी आला होता. यावेळी त्याने ५ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या आणि यामध्ये त्याने षटकार मारला.
कोलकाता नाईट राइडर्सच्या गोलंदाजांबद्दल सांगायचं झालं तर संघाने सुरुवातील अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. संघाच्या हाती १२.२ ओव्हरपर्यत एकही विकेट लागला नव्हता त्याने गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शनचा विकेट आंद्रे रसेलने घेतला. त्यानंतर गुजरातने दुसरा विकेट शुभमन गिलचा गमावला. वैभव अरोडाने त्याला बाद केले.