रोहित शर्मा (फोटो- ians)
लॉर्ड्सवरील ऐतिहासिक शतकानंतर रोहित शर्माने चाहत्यांची नजर चुकवून केलेल्या या प्रवासाची सध्या सोशल मीडिया आणि क्रीडा जगतात तुफान चर्चा सुरू आहे. रोहित शर्माने काल 138 रन्सची शानदार खेळी केली आहे. त्यानंतर त्याने टीम इंडियाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर तो बैठक झाल्यावर गुपचुप बाहेर पडल्याचे म्हटले जात आहे.
रोहित शर्माची झलक पाहण्यासाठी त्याचे शेकडो चाहते हॉटेलबाहेर त्याची प्रतीक्षा करत होते. मात्र कोणत्याही सुरक्षेशिवाय किंवा मोठ्या थाटामाटाशिवाय रोहित शर्मा मागच्या दाराने गपचूप बाहेर पडल्याचे समोर येत आहे. ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराच्या माहितीनुसार रोहित शर्माने कुटुंबाची भेट घेण्यासाठी गपचूप प्रवास केल्याचे म्हटले जात आहे.
After scoring the most crucial century of his career, Rohit Sharma chose to stay away from the limelight. Despite being the centre of everyone’s attention and thousands of fans waiting outside the hotel, he quietly slipped out of the hotel through the back entrance in slippers… pic.twitter.com/CjwzERmE2x — Kusha Sharma (@Kushacritic) July 20, 2026
रोहित शर्माचे कुटुंबीय देखील लंडनमध्ये असल्याचे समोर येत आहे. त्यांची भेट घेणासाठी तो गपचूप मागच्या दरवाजाने गेला असल्याचे सांगण्यात येत आहेत. रोहित शर्मा अगदी टी शर्ट, शॉर्ट्स आणि स्लिपर्स हॉटेलच्या मागच्या दाराने बाहेर पडल्याचे म्हटले जात आहे. रोहित शर्माने ‘मला माझ्या कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे मी कोणाला न सांगता इकडून बाहेर पडत आहे.
रोहित शर्मा कोणतीही खासगी कार किंवा टॅक्सी बूक न करता त्याने लंडन ट्यूब म्हणजेच तेथील स्थानिक मेट्रो/रेल्वेने प्रवास करून कुटुंब वास्तव्याला असलेल्या ठिकाणी गेल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित शर्मा लॉर्डसच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावार वनडेमध्ये शतक लगावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.






