मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. हा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याची मुलगी समायरासोबत दिसत आहे. रोहितने आपल्या मुलीला त्याच्या खांद्यावर धरले आहे. यावेळी तो चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन करताना दिसत आहे. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल सुद्धा होत आहे, ज्यामध्ये रोहित तोंडावर बोट ठेवून चाहत्यांना शांत राहण्याचा सल्ला देताना दिसत आहे. रोहित शर्मा हा फॅमिली मॅन आहे. हिटमॅनचे आयुष्य त्याची पत्नी आणि मुलगी समायरामध्ये आहे. रोहितला अनेकवेळा आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रोहित पत्नी आणि मुलीसोबत विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. रोहितच्या खांद्यावर समायरा आहे आणि ती झोपली आहे. रोहितने चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. रोहितला पाहण्यासाठी त्याचे चाहते मोठ्या संख्येने आले होते.
Rohit Sharma asked to not make any noise as Samaira was sleeping.
– A cute video! ❤️ pic.twitter.com/JiOMsaJI3b
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 5, 2024
मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवले आहे. त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे कमान सोपवण्यात आली आहे. या मोसमातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये मुंबईला सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पांड्याला कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात आले.