फोटो सौजन्य - PCB/BCCI सोशल मीडिया
Shoaib Akhtar reaction after Team India won the Champions Trophy 2025 : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे जेतेपद भारताच्या नावावर झाले आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करून एकही सामना न गमावता चॅम्पियन झाला आहे. यानंतर दुबईच्या स्टेडियमवर मोठ्या उत्साहात चॅम्पियन ट्रॉफीचे मेडल सेरेमनी करण्यात आली. यंदा चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चे यजमान पद पाकिस्तानकडे होते पण भारताच्या संघ सुरक्षेच्या कारणांमुळे पाकिस्तानला गेला नाही त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. फायनलच्या सामन्यामध्ये भारताच्या संघ खेळला त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीचा अंतिम सामना देखील दुबईमध्ये खेळवण्यात आला.
या सामन्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये त्याने पीसीबीला सोशल मीडियावर फटकारले आहे. कालच्या सामन्यानंतर ट्रॉफी देण्याचा त्याचबरोबर मेडल सेरेमनीचा कार्यक्रम झाला यामध्ये आयसीसीचे अध्यक्ष जय शाह त्याचबरोबर बीसीसीआयचे अनेक अधिकारी तेथे उपस्थित होते. पण पाकिस्तान यजमान देश असूनही एकही अधिकारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा नसल्यामुळे शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर म्हणाला की, हा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी हिंदुस्तानने जिंकली आहे, यामध्ये मी एक गोष्ट पाहिली की पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा एकही अधिकारी तिथे उपस्थित नव्हता.
आता अख्तर म्हणाला की, पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी होस्ट करत असूनही इथे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. कोणी इथे उपस्थित का नव्हता आणि कोणी ट्रॉफीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिकडे का गेले नाही, ट्रॉफी द्यायला का गेले नाही? हे माझ्या समजण्याच्या बाहेर आहे याबद्दल विचार करण्याची गरज आहे. जागतिक मंच आहे यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने तेथे असणे गरजेचे होते, पण दुःखद आहे की मला तिथे पीसीबीचा कोणताही अधिकारी दिसला नाही, याबद्दल विचार करायला हवा असे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे.
शोएब अख्तरने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे यामध्ये त्याने भारतीय संघाला विजयी झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या आहेत आणि म्हणाला की डिझर्विंग संघ विजयी झाला आहे मागील १० वर्षांपासून टीम इंडिया ही क्रिकेट विश्वामध्ये कमाल करत आहे. त्यामुळे भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफीचे जेतेपद जिंकणे हे सर्वांसाठीच आनंदाची गोष्ट आहे.