श्रेयस अय्यरसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल (फूट- ट्विटर)
पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्यात दिसला अय्यरसारखा हुबेहूब व्यक्ती
पाकिस्तान-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू आहे वनडे सिरिज
पहिल्या सामन्यात कर्णधार बाबर आझम ठरला अपयशी
Austrelia Vs Pakistan ODI Series: सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला आहे. या सामन्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मिडियावर या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. या व्हीडिओत एक तरुण दिसत आहे आणि तो श्रेयस अय्यर आहे किंवा त्याच्यासारखा दिसतो अशी चर्चा सरू झाली आहे.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जिंकण्यासाठी खेळत असताना, स्टेडियमवर एक मजेशीर व्हिडिओ प्रचंड व्हायरल झळा आहे. सामना रंगात आला असतानाच कॅमेरामनने अचानक आपले लक्ष मैदानावरून हटवून स्टेडियममधील प्रेक्षकांकडे केंद्रित केले. तेव्हा तिथे एक तरुण बसलेला दिसला.
व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये एक तरुण दिसून येत आहे. त्याच्याकडे पाहताच तो भारतीय टी -20 संघाचा होणारा कर्णधार श्रेयस अय्यर असल्याचा भास होतो आहे. तो व्यक्ति श्रेयस अय्यरसारखाच दिसत असल्याने सोशल मिडियावर मीम्सचा पूर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Shreyas Iyer spotted in Pakistan vs Australia match 🤯 pic.twitter.com/lhFcKFSeiG — Internet umpire (@Internetumpire7) June 4, 2026
मात्र हा श्रेयस अय्यर च आहे का अशी चर्चा सुरू असताना कॅमेरा त्या व्यक्तिवर जोम करण्यात आला. कॅमेरा झूम करून त्या व्यक्तीवर नेण्यात आला आणि सत्य समोर आले. तो तरुण प्रत्यक्षात श्रेयस अय्यर नसून, हुबेहूब त्याच्यासारखाच दिसणारा एक पाकिस्तानी चाहत होता. सध्या हा व्हिडिओ क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड शेअर केला जात असून, यावर विविध गमतीशीर प्रतिक्रिया उमटत आहेत.
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली असून आता गुरुवारचा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मात्र कर्णधार जोश इंग्लिस आणि कॅमेरून ग्रीन यांनी अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला सावरले. ऑस्ट्रेलियाने 231 रन्सपर्यन्त मजल मारली.
अत्यंत खराब खेळ शिकायचा आहे? मग Pakistan कडे पहा; ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाबर आझम अन्…
दरम्यान त्यानंतर पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाथी मैदानात उतरला. पाकिस्तानचा संघ या सामन्यात पराभूत झाला आहे. पाकिस्तानसमोर अधिक मोठे टार्गेट नव्हते. मात्र सुरुवातीपासूनच फलंदाजांनी शरणागती पत्करली. सलामीवीर माज सदाकत शून्यावर बाद झाला, तर साहिबजादा फरहान केवळ 3 रन्स करून तंबूत परतला. सर्वांचे लक्ष बाबर आझमच्या कामगिरीवर होते. मात्र त्याने देखील निराशा केली. तो केवळ 16 रन्स करून आउट झाला. पाकिस्तानचा संघ अधिक लवकर आउट झाला असता.






