भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या (Ind Vs Zim) एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करून मालिका जिंकली. या मालिकेत भारतीय संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) चमकदार कामगिरीकरून पहिले एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. गिलने मालिकेत २४५ धावा केल्या. या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर गिल प्रसिद्धीच्या झोतात आला होता. यातच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (sachin tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर आणी शुभमन गिलच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
सारा तेंडुलकर आणि शुभमनचे इंस्टाग्राम (instagram)अकाउंट पाहिले असता दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केले आहे. मात्र सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शहनील गिलला फॉलो केले आहे. यानंतर शुभमन आणि सारा या दोघांची मैत्री संपली की काय अशी चर्चा रंगली आहे. सारा आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा पहिल्यांदा २०१९ मध्ये पसरली होती. या दोघांनीही यावर कधीही भाष्य केले नाही, परंतु त्यांच्या अफेअरच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात आणि सोशल मीडियावर या नात्याबद्दल बरेच मीम्स बनवले जातात.
शुभमन गिल २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. या हंगामानंतर त्याने ‘रेंज रोव्हर’ कार खरेदी केली होती. त्याचा फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला. साराने या फोटोवर शुभमनचे अभिनंदन केले होते आणि शुभमनने हृदयाच्या इमोजीसह तिचे आभारही मानले होते. या पोस्टवर अनेक चाहत्यांनी दोघांमधील अफेअरला हवाही दिली होती. येथून त्यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, आता या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले आहे.