कर्णधार शुभमन गिलच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा 'हा' मोठा विक्रम (Photo Credit- X)
IND vs AUS ODI Series: भारतीय संघ (Team India) तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे आणि त्यांनी १७ ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर सराव केला. भारतीय संघ बराच काळानंतर एकदिवसीय सामना खेळत आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी युवा फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गिलला आता कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात एक महत्त्वपूर्ण कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे, जी आजपर्यंत फक्त एकाच भारतीय कर्णधाराला साधता आली आहे!
आतापर्यंत एकूण २७ खेळाडूंनी एकदिवसीय स्वरूपात भारताचे नेतृत्व केले आहे. या २७ कर्णधारांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर हा असा खेळाडू आहे, ज्याने त्याच्या एकदिवसीय कर्णधारपदाच्या पदार्पणात शतक झळकावले आहे. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार म्हणून पदार्पण करेल. जर त्याने या सामन्यात शतक झळकावले, तर तो सचिन तेंडुलकरच्या या दुर्मिळ विक्रमाशी बरोबरी करेल.
India vs Australia : शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, भारतीय संघाला लागणार मोठा झटका! वाचा सविस्तर
भारतीय कर्णधाराने पहिल्या वनडेत केलेल्या सर्वाधिक धावा:
खेळाडू | धावा |
सचिन तेंडुलकर | ११० धावा |
शिखर धवन | ८६ धावा |
अजित वाडेकर | ६७ धावा |
रवी शास्त्री | ५० धावा |
अजय जडेजा | ५० धावा |
शुभमन गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या मालिकेत एक आणखी मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे: गिलने आतापर्यंत ५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २,७७५ धावा केल्या आहेत. त्याला ३,००० एकदिवसीय धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त २२५ धावांची आवश्यकता आहे.
मालिकेचे वेळापत्रक: