MI Vs CSK Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने
आयपीएलच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला
वानखेडे स्टेडियमवर होणार सामना
Tata IPL 2026 MI vs CSK Live Updates: आयपीएलचा थरार 27 मार्चला सुरू झाला असला तरी खरा महामुकाबला आज होणार आहे. आज सर्वात जास्त वेळेस स्पर्धा जिंकलेले दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आज मुंबई वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात महामुकाबला होणार आहे. आजच्या सामन्यासाठी (IPL 2026) पीचचा रिपोर्ट जाणून घेऊयात.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवार आज चेन्नई विरुद्ध मुंबई असा महामुकाबला होणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि हार्दिक पंड्या आमनेसामने येणार आहेत. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आजच्या सामन्यात एम.एस. धोनी खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यात वानखेडेची खेळपट्टी कोणाला साथ देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
वानखेडेची खेळपट्टी ही परंपरेने फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. यंदाच्या आयपीएलमध्ये वानखेडेवर झालेल्या सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 200 ते 220 दरम्यान राहिलेली आहे. लाल मातीच्या या खेळपट्टीवर चेंडू बॅटवर चांगल्या प्रकारे येतो आणि याचा फायदा फलंदाजांना मिळतो. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते. चेंडू ओला झाल्यास स्पिनर्सला एवढी मदत मिळत नाही.
IPL मध्ये रविंद्र जडेजाची धूम, निशाण्यावर MS Dhoni चा मोठा रेकॉर्ड; लवकरच करणार बरोबरी
मुंबईकडून रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर नजरा असतील. तर चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून खेळण्याची शक्यता असलेला महेंद्रसिंह धोनीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजचा सामना रंगतदार आणि रोमांचक होणार यात शंका नसून, फलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर जो संघ चांगली गोलंदाजी करेल, तोच विजयी होण्याची शक्यता जास्त आहे.
मागच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिलक वर्माने शानदार शतक केले. भेदक गोलंदाजी आणि तिलक वर्माचे शानदार शतक या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरातचा 101 रन्सने पराभव केला. त्यामुळे मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानावर पोहोचली आहे. तर चेन्नईचा संघ 8 व्या स्थानावर आहे.






