RR Vs DC Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
यशस्वी जयस्वाल विरुद्ध कुलदीप यादव रंगणार सामना
जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर येणार आमनेसामने
प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना सामना जिंके आवश्यक
Tata IPL 2026 Live Updates RR Vs DC: आज जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स चौथ्या तर दिल्ली कॅपिटल्स सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे दिल्लीसाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक असणार आहे. आज आपण दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड आणि प्लेइंग 11 जाणून घेऊयात.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमधील लढत नेहमीच चुरशीची ठरली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 15 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांचे पारडे समान असले तरी, जयपूरच्या मैदानावर राजस्थानचा रेकॉर्ड दिल्लीपेक्षा चांगला आहे. गेल्या हंगामात दिल्लीने राजस्थानला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले होते. त्यामुळे राजस्थानला गफील राहून चालणार नाही.
DC Vs RR Pitch Report: दिल्ली विरुद्ध राजस्थान रंगणार सामना; टॉस जिंकून पहिल्यांदा…, पहा पीच रिपोर्ट
अक्षर पटेलच्या दिल्लीसाठी आजचा सामना ‘करा किंवा मरा’ असा असणार आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आणि आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे गरजेचच असणार आहे. आतापर्यंत दिल्ली केवळ 3 सामने जिंकली आहे. गेल्या तीन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करून पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
कशी असेल आजची खेळपट्टी?
आजचा दिल्ली विरुद्ध राजस्थानचा सामना जयपूरमध्ये होत आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. जयपूरची खेळपट्टी ही फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी चांगली समजली जाते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये नवीन बॉल असेल तर स्विग मिळू शकतो. दुसऱ्या डावात गोलंदाज प्रभावी मारा करू शकतात.
मॅच सुरू झाल्यावर काही ओव्हर्सनंतर खेळपट्टी थोडी संथ होऊ शकते, ज्यामुळे मधल्या ओव्हर्समध्ये कुलदीप यादव यांसारख्या फिरकीपटूंना मदत मिळेल. खेळपट्टीवर फलंदाज स्थिरावला की, येथे मोठे फटके मारणे सोपे जाते. आउटफील्ड वेगवान असल्याने चेंडू सीमारेषेपलीकडे लवकर पोहोचतो.
GT Vs RCB Live: गुजरातने काढला पराभवाचा वचपा; ‘टायटन्स’ने आरसीबीला केले चारीमुंड्या चीत
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, दसुन शनाका, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा
दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: साहिल पारख, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), नितीश राणा, समीर रिझवी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क / दुष्मंथा चमीरा, काइल जेमीसन, कुलदीप यादव, टी. नटराजन






