DC Vs CSK Live Streaming (फोटो- ट्विटर)
अक्षर पटेलचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय
चेन्नई अन् दिल्लीसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा
60 रन्सवर दिल्लीने गमावल्या 4 विकेट्स
Tata IPL 2026 DC Vs CSK Live Updates: दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना सुरू आहे. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हर्समध्ये 155 रन्स केल्या आहेत. आता चेन्नई सुपर किंग्जला (IPL 2026) विजयासाठी र156 न्सची गरज असणार आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असल्याने आक्रमक आणि जबाबदारीचा खेळ पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले केएल राहुल आणि पथूम निसांका हे मैदानात सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी मैदानात उतरले. दोघांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलचा फलंदाजी करण्याचा निर्णय सुरुवातीला काहीसा चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले.
केएल राहुल 12 आणि पथूम निसांका केवळ 19 रन्स करून आउट झाले. त्यामुळे दिल्लीला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. त्यापाठोपाठ करून नायर 13 आणि डावखुरा फलंदाज 15 रन्स करून आउट झाले. स्टब्स आणि समीर रिझवीने दिल्ली कॅपिटल्सची बाजू सांभाळून धरली. ट्रिस्टन स्टब्सने 38 रन्सची महत्वाची खेळी केली. आशुतोष शर्माने शेवटच्या ओव्हर्समध्ये महत्वाची खेळी केली. 9 बॉलमध्ये 14 रन्सची महत्वाची खेळी केली.
DC Vs CSK Live: दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यावर पावसाचे संकट? अक्षर पटेलने टॉस जिंकून घेतला…
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जकडून आज पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अकील हुसेनने केएल राहुलची विकेट मिळवली. मुकेश चौधरीने पथूम निसांकाला आउट केले. त्यापाठोपाठ नूर अहमदने नितीश राणाची विकेट पटकावली. गुर्जनप्रीत सिंगने शानदार गोलंदाजी करत कर्णधार अक्षर पटेलला आउट केले. नूर अहमदने करून नायरला देखील आउट केले.
Standing tall and punching back! 👊 Tristan Stubbs and Sameer Rizvi with a very crucial 5️⃣0️⃣-run stand for #DC 🤝 Updates ▶️ https://t.co/f1bRZthndy#TATAIPL | #KhelBindaas | #DCvCSK | @DelhiCapitals pic.twitter.com/pMdhLi6DQo — IndianPremierLeague (@IPL) May 5, 2026
दिल्ली कॅपिटल्स: के. एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी/काईल जेमिसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.
ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
चेन्नई सुपर किंग्स: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्वील पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग.






