CSK vs DC Live Streaming (फोटो- सोशल मिडिया)
अरुण जेटली स्टेडियमवर होणार सामना
केएल राहुल आणि संजू सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष
महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही याकडे लक्ष
Tata IPL 2026 CSK Vs DC Live Updates: थोड्याच वेळात दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होणार आहे. चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड आणि दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेल करत आहे. दोन्ही संघांचे पॉईंट्स 8 आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान (IPL 2026) आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
दिल्ली आणि चेन्नई संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. प्ले ऑफ मध्ये जाण्यासाठी या संघाना जवळपास पुढील सर्व सामने जिंकणे महत्वाचे असणार आहेत. त्यामुळे अरुण जेटली स्टेडियमवर आज मोठ्या धावसंख्या उभी राहण्याची शक्यता आहे. अक्षर पटेल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाची आज कसोटी लागणार आहे.
पीच रिपोर्ट काय सांगतो?
अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. हे स्टेडियम थोडे लहान असल्याने मोठे फटके मारणे या ठिकाणी सोपे जाते. मात्र या पीचवर स्पिनर्सला देखील मदत मिळू शकते. दिल्लीत आज आकाश निरभ्र असून पावसाची शक्यता केवळ १०% इतकी आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
ऋषभ पंत अडचणीत? LSG चे कर्णधारपद हातातून जाणार? सततच्या अपयशामुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
आजच्या सामन्यात कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीवर मदार असणार आहे. फलंदाजीमध्ये केएल राहुल, पाथुम निसांका अत्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. मात्र मिचेल स्टार्कची गोलंदाजी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन हे चेन्नईचे मुख्य खेळाडू आहेत. गेल्या सामन्यात संजू सॅमसनने दिल्लीविरुद्ध शतकी खेळी केली होती. तर अंशूल कंबोजने चेन्नईकडून 13 विकेट्स घेतल्या आहेत.
CSK Vs DC Pitch Report: आज घनघोर युद्ध होणार! चेन्नई अन् दिल्ली खेळणार, पहा आजचा पीच रिपोर्ट
दिल्ली कॅपिटल्स: के. एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी/काईल जेमिसन, कुलदीप यादव, टी. नटराजन
चेन्नई सुपर किंग्स: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्वील पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग.






