गौतम गंभीर (फोटो -सोशल मिडिया)
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वर्तुळात गौतम गंभीरच्या कार्यशैलीवर आणि हेड कोच पदाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
अहो गौतमराव जरा ‘गंभीर’ होणार का? Team India तर स्थान मिळवण्यासाठी Kuldeep Yadav चा संघर्ष, आता तरी…
एखाद्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याचा दोष खेळाडू, सपोर्ट स्टाफवर ढकलला जात असल्याची भावना संघात निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे. यावर अद्याप गौतम गंभीर आणि बीसीसीआयकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. अशा स्वरूपाच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मिडियावर आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील भारताचा पराभव झाला आहे. मात्र त्यानंतर देखील बीसीसीआयने गौतम गंभीरवर थेट किंवा ठोस अशी कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. अहवालानुसार, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमधील पराभवांसाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मुख्य दोषी मानले नव्हते.
क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी
त्यावेळी बीसीसीआयच्या व्यवस्थापनाची अशी धारणा होती की, मैदानातील या खराब कामगिरीसाठी मुख्यत्वे खेळाडूच जबाबदार होते. खेळाडूंची खराब फॉर्म आणि मैदानातील चुका यामुळेच संघाला पराभव स्वीकारावा लागला, असे मानले गेले. जरी आधीच्या पराभवांच्या वेळी गंभीर यांना दिलासा मिळाला असला, तरी सध्याच्या स्थितीत बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला असल्याचे म्हटले जात आहे. आगामी श्रीलंका कसोटी मालिका गौतम गंभीर यांच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. जर या मालिकेतही भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली, तर बीसीसीआय गंभीर यांच्यावर कडक पावले उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.






