फोटो सौजन्य - X
अॅशे टी-20 मालिका सध्या आहे, म्हणजेच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन संघांमध्ये मालिका खेळवली जात आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आज तिसरा टी-ट्वेंटी सामना मिळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली होती त्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने धुमाकुळ होता. आजचा हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचे असणारा आहे. मागील सामन्यामध्ये डेव्होल्ड ब्रेविस याने शतक झळकावून नाबाद खेळी खेळली होती.
आजच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद हे एडन मारक्रम याच्याकडे आहे तर ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद हे मिचेल मार्शकडे सोवण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामना कधी आणि कुठे खेळवला जाणारा आहे या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणार आहे 16 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार दोन वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार आहे. या सामन्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल. भारतामध्ये या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर पाहता येणार आहे. या सामन्याचे टेलिव्हिजनवर थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या t20 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 53 धावांनी पराभूत केले होते. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेमध्ये बरोबरी केली होती. पहिला सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज टीम डेविड याचे जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने 17 धावांनी विजय मिळवला होता. आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवेल तो संघ मालिकेमध्ये जिंकणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे.
एडेन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन (विकेटकिपर), लुआन-ड्रे प्रिटोरियस, डेवाल्ड ब्रेव्हिस, ट्रिस्टन स्टब्स, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, क्वेना माफाका, लुंगी एनगिडी, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, प्रेनेलन सुब्रायन, नांद्रे बर्गर, नकाबायोम्झी पीटर
ट्रॅव्हिस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकिपर), कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, मिशेल ओवेन, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, जोश हेझलवुड, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, आरोन हार्डी, मॅथ्यू कुहनेमन