आयसीसी क्रमवारीत अभिषेक शर्माची दुसऱ्या स्थानावर झेप (फोटो- ट्विटर)
ICC Ranking: नुकतीच भारत विरुद्ध इंग्लंडयांच्यातील 5 टी-20 सामन्यांची मालिका संपली आहे. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताचा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तुफानी खेळी केली होती. या सामन्यात अभिषेक शर्माने 135 धावांची वादळी खेळी केली. तर भारताने इंग्लंडला या सामन्यात 150 धावांनी पराभव केला. अभिषेक शर्माने केलेल्या वादळी खेळीमुळे आयसीसीच्या क्रमवारीत मोठे बदल झाले आहेत. तसेच स्पिनर गोलंदाज वरुण चक्रवर्तीने देखील या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
अभिषेक शर्माने आयसीसी क्रमवारीत घेतली मोठी झेप
भारताचा फलंदाज अभिषेक शर्माने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसीच्या क्रमवारीत अभिषेक शर्माने सर्वोत्तम कामगिरी करत फलंदाजांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. अभिषेक शर्माने तब्बल 38 जणांना मागे टाकत दुसरे स्थान गाठले आहे. अभिषेककडे सध्या 829 गुण आहेत. तर पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आहे.
https://twitter.com/ICC/status/1887049535169441953
अभिषेक शर्माने इंग्लंडला धू-धू धुतला
डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तडाखेबंद शतक लगावले. अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतकी खेळी केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अभिषेक शर्माचे वादळ घोंघावत होते. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांना त्याने सेट होऊ दिले नाही. 118 व्या ओव्हरमध्ये शर्मा बाद झाला. त्याने 54 चेंडूत 135 धावा ठोकल्या. अभिषेक शर्माने केवळ 37 चेंडूत शतक पूर्ण केले. 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकार लगावले. अभिषेक शर्माने या प्रकारे लगावलेले हे दुसरे शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात तिसरे वेगवान शतक आहे. याधी रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी याप्रकारे शतक लगावले आहे. भारताच्या संघासाठी पॉवरप्ले अत्यंत चांगला गेला. भारतीय संघाने 1 विकेट गमावून 95 धावा केल्या. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यात भागीदारी झाल्याचे दिसून आले. अभिषेक शर्माने 17 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे.
हेही वाचा: Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माने इंग्लंडला धू-धू धुतला; 54 चेंडूत 135 धावांची वादळी खेळी
अभिषेक शर्मा रविवारी २ फेब्रुवारीला धगधगत्या शैलीत दिसला. सुरुवातीपासूनच, अभिषेक शर्माने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांवर आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि काही वेळातच त्याने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर ३७ चेंडूत आपले दुसरे शतक पूर्ण केले. एवढेच नाही तर अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी वैयक्तिक खेळी खेळली. त्याने ५४ चेंडूत २५० च्या स्ट्राईक रेटने १३५ धावा केल्या. या खेळीत अभिषेक शर्माने चौकारांपेक्षा जास्त षटकार मारले, जे पाहण्यासारखे होते. हा स्वतःच एक विक्रम आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला टी-२० सामन्यात १० पेक्षा जास्त षटकार मारता आलेले नाहीत, मात्र अभिषेक शर्माने १३ षटकार मारले आहेत.