फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
वरुण चक्रवर्ती : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या काल सामना झाला या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने ४४ धावांनी विजय मिळवला आहे. यामध्ये भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर आणि वरुण चक्रवर्तीच्या जोरावर संघाने दणदणीत विजय मिळवून संघाला चॅम्पियन ट्रॉफीच्या गुणतालिकेमध्ये अव्वल स्थान मिळवून दिले आहे. भारताचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने संघासाठी पाच महत्वाचे विकेट्स घेतले आणि पुन्हा एकदा त्याने मैदानावर त्याची जादू दाखवली. मागील बऱ्याच वर्षापासून त्याला संघामधून वगळण्यात आले होते पण त्याने केलेल्या T-२० मधील कामगिरी पाहता त्याने त्याची कमाल एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील दाखवली आहे.
Champions Trophy 2025 : भारतीय संघातील या सदस्याच्या आईचे निधन, चॅम्पियन ट्रॉफी सोडून परतला मायदेशी
वरुण चक्रवर्तीने फक्त T-२० मधेच नाही तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचबरोबर झालेल्या इंग्लंडविरुद्ध मालिकेमध्ये सुद्धा कमालीची कामगिरी करून बीसीसीआयच्या निवड समितीला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये स्थान देण्यात भाग पाडले आहे. झालेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध सामन्यामधून त्याला वगळण्यात आले होते. पण हर्षित राणाच्या जागेवर न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली. या सामन्यात त्याने १० ओव्हर टाकल्या आणि ४२ धावा देत ५ फलंदाज बाद केले. वरुण चक्रवर्तीने विल यंग, ग्लेन फिलिप्स, मिचेल ब्रेसवेल, कर्णधार मिचेल सॅन्टर आणि मॅट हेनरी यांना बाहेरचा रस्ता दाखवला.
For guiding #TeamIndia to their third win and getting five wickets, Varun Chakaravarthy is the Player of the Match
Scoreboard ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/FvnSCBeXq7
— BCCI (@BCCI) March 2, 2025
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात किवी संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये भारतच्या संघाने पहिले तीन विकेट लवकर गमावले होते. शुभमन गिलने संघासाठी फक्त २ धावा केल्या तर रोहित सुद्धा मोठी कामगिरी करून शकला नाही, रोहितने १५ धावा केल्या. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सामन्यामध्ये शतक ठोकले होते त्याचबरोबर न्यूझीलंड त्याने ३०० वा सामना खेळला. पण तो न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात विराट काही विशेष कामगिरी करू शकला नाही. भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरने टीम इंडियाचा खेळ सांभाळला आणि त्याने संघासाठी ९८ चेंडूंमध्ये ७९ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार आणि ४ चौकार ठोकले.
भारतीय संघासाठी हार्दिक पंड्याने संघासाठी महत्त्वाची खेळी खेळली, हार्दिकने संघासाठी ४५ चेंडूमध्ये ४५ धावा केल्या. तर अक्सर पटेलने ४२ धावांची महत्त्वाची खेळी खेळली. कुलदीप यादवने २ विकेट्स घेतले. तर अक्सर पटेल, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.