फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Gautam Gambhir’s reply to Shashi Tharoor : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका झाली आणि या मालिकेमध्ये भारताच्या संघाला 1-2 असा पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने या मालिकेमध्ये गोलंदाजी फार काही चांगली केली नव्हती. भारताच्या संघाने मालिका गमावल्यानंतर गौतम गंभीरवर टीका करण्यात आली. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका ट्विटची चर्चा टीम इंडियाच्या विजयापेक्षा जास्त होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याच्या एक दिवस आधी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली आणि त्यांचे खूप कौतुक केले. त्यांनी गंभीरला “पंतप्रधानांनंतर सर्वात कष्टाळू व्यक्ती” म्हटले. भारताच्या विजयानंतर प्रशिक्षक गंभीर यांनी यावर उत्तर दिले. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून त्यांचे आभार मानले.
नागपुरात न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी झालेल्या भेटीनंतर थरूर यांनी सोशल मीडियावर गंभीरबद्दल आदर व्यक्त केला. त्यांनी कबूल केले की भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणे हे एक असे पद आहे ज्यावर प्रचंड दबाव आणि टीका असते.
थरूर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ‘एक्स’ वर लिहिले, खूप खूप धन्यवाद @SashiTharoor! जेव्हा धूळ शांत होईल, तेव्हा प्रशिक्षकाकडे ” अमर्यादित अधिकार ” आहेत याचे सत्य आणि तर्क स्पष्ट होतील. तोपर्यंत, जे माझे स्वतःचे आणि सर्वोत्तम आहेत त्यांच्याविरुद्ध उभे राहिल्यावर मी हसू!
Thanks a lot Dr @ShashiTharoor! When the dust settles, truth & logic about a coach’s supposedly “unlimited authority” will become clear. Till then I’m amused at being pitted against my own who are the very best! https://t.co/SDNzLt73v5 — Gautam Gambhir (@GautamGambhir) January 21, 2026
गंभीरच्या या विधानामुळे निवड समितीला, विशेषतः अजित आगरकरला उद्देशून हे विधान केले आहे का, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे, परंतु गंभीरने कोणाचेही नाव घेतले नाही किंवा कोणाचाही उल्लेख केला नाही. सततच्या टीकेला तोंड द्यावे लागल्यानंतर गंभीर भारताच्या विजयावर प्रतिक्रिया देत होता का, की तो अशा अंतर्गत व्यवस्थेकडे इशारा करत होता जिथे प्रशिक्षक लोकांना सत्य जाणून घ्यायचे आहे.






