फोटो सौजन्य - BCCI
बेस्ट फिल्डर : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यामध्ये सेमीफायनल २ चा सामना २७ जून रोजी पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने इंग्लिश फलंदाज १०३ धावांवर सर्वबाद केले आणि ६८ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी खेळून मोठी धावसंख्या उभारली त्याचबरोबर त्याला साथ सूर्यकुमार यादवने दिली. सूर्यकुमार यादवने ३६ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. तर सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षर पटेलला देण्यात आला. भारतासाठी इंग्लंडसारख्या मजबूत संघाचे सेमीफायनल २ मध्ये मोठे आव्हान होते. परंतु भारताच्या गोलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी करून इंग्लिश फलंदाजांना फार वेळ टिकू दिले नाही.
भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये विश्वचषकाचा सामना संपल्यानंतर एक मेडल समारंभ केला जातो. यामध्ये तो उत्कृष्ट फिल्डिंग करेल त्या खेळाडूला या मेडलचा मान दिला जातो. जो सामना सुरु असेल त्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट फिल्डर निवडण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच दिलीप टीके (Dilip TK) हे मैदानावर निरीक्षण करत असतात. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यामध्ये हा पुरस्कार किंवा मेडल प्रदान करण्यासाठी दिग्गज खेळाडूला बोलावले जाते. यामध्ये युवराज सिंह, सर विव्ह रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर अशा अनेक दिग्गजांना आमंत्रित केले जाते. यावेळी भारताचा दिग्गज खेळाडू दिनेश कार्तिकला आमंत्रित केले होते. यावेळी त्याने बेस्ट फिल्डरची घोषणा घोषणा केली होती.
सेमीफायनलचा सामना झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे फिल्डिंग कोच दिलीप टीके यांनी मेडल समारंभ आयोजित केला होता. यामध्ये त्यांनी पहिले तीन बेस्ट फिल्डिंग करणाऱ्यांची नाव सांगितली. यावेळी त्यांनी सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव , रिषभ पंत ही नवे या यादीमध्ये होती. यावेळी दिनेश कार्तिकला हे मेडल देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बेस्ट फिल्डिंगचे हे मेडल रिषभ पंत याने जिंकले आणि मेडल मिळवले.