मुख्यमंत्र्यांच्या घरी विश्वविजेत्या कर्णधाराची घडली भेट..(फोटो-सोशल मिडिया)
Former captain visits Chief Minister’s house: भारतीय संघाचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीचे ही सौजन्याने दिलेली भेट म्हणून वर्णन करण्यात येत आहे. ज्याचा फोटो सद्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर कपिल देव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, “प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार श्री. कपिल देवजी यांनी आज लखनौ येथील माझ्या अधिकृत निवासस्थानी भेट दिली.”
कपिल देव यांनी १९७८-१९९४ या कालावधीत भारतासाठी क्रिकेट खेळले आहे. जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. कपिल देव यांनी १३१ कसोटी सामन्यांमध्ये ५२४८ धावा आणि ४३४ विकेट्स घेतल्याअ आहेत. यासोबतच त्यांनी २२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७८३ धावा केल्या आहेत. या काळात त्यांनी २५३ विकेट्स देखील घेतल्याअ आहेत. १९८३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता.
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर कपिल देव भारताचे प्रशिक्षक देखील बनले होते. त्यांनी १९९९ ते ऑगस्ट २००० पर्यंत भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. तसेच त्यांनी समालोचक आणि हरियाणा क्रीडा विद्यापीठाचे कुलपती अशा वेगवेगळ्या भूमिका देखील चोख बजावल्या आहेत.
प्रख्यात क्रिकेट खिलाड़ी एवं 1983 की विश्व कप विजेता भारतीय क्रिकेट टीम के कप्तान श्री कपिल देव जी ने आज लखनऊ स्थित सरकारी आवास पर शिष्टाचार भेंट की।@therealkapildev pic.twitter.com/10jsXDn8bG
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 2, 2025
कपिल देव यांची जून २०२४ मध्ये प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील एकमताने निवड झाली होती. याआधी, ते २०२१ ते २०२३ पर्यंत पीजीटीआयच्या उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग कमिटीचे सदस्य राहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात ‘कपिल देव ग्रँट थॉर्नटन इन्व्हिटेशनल’ नावाची गोल्फ स्पर्धा सुरू करण्यात आली.
हेही वाचा : IPL 2025 : ‘विराट भाईंकडेही इतक्या बॅट नसतील..’ Vaibhav Suryavanshi च्या बॅटचा खजाना बघून नितीश राणा आला शरण, पहा व्हिडिओ
मार्च २०२५ मध्ये, पीजीटीआय आणि अदानी ग्रुपने एकत्रितपणे ‘अदानी इन्व्हिटेशनल गोल्फ चॅम्पियनशिप २०२५’ ची घोषणा केली आहे. या स्पर्धेची पहिली आवृत्ती १ ते ४ एप्रिल दरम्यान ग्रेटर नोएडा येथील जेपी ग्रीन्स गोल्फ स्पा रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आली होती. ११ वर्षांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा तिथेच आयोजित करण्यात आली होती.