भारताचा क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री (Dhanahsree Chahal) या दोघांचे वैयक्तिक आयुष्य सध्या फारच चर्चेत आहे. यजुवेंद्र चहलच्या पत्नीने तिच्या सोशल मिडीयावरून चहल हे आडनाव काढून टाकल्याने दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातमीला पेच फुटला होता. मात्र धनश्री चहलने नुकतीच एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत ह्या प्रकाराबाबत खुलासा केला आहे.
धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने लिहिले की, “आमच्या नात्याबाबत पसरलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया या अफवा पसरवण बंद करा”. धनश्रीच्या या पोस्टनने अनेकांचे लक्ष वेधले. त्यामुळे धनश्रीकडून घटस्फोटाबाबत सुरु असलेल्या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे.
धनश्री आणि यजुवेंद्र यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांची लव्ह स्टोरी अतिशय फिल्मी आहे. लॉकडाऊन दरम्यान यजुवेंद्रला काही तरी नवं शिकायचं होतं. त्यावेळी धनश्रीकडून डान्स शिकण्याचा निर्णय यजुवेंद्रने घेतला. त्यवेळी धनश्री आणि यजुवेंद्रची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.