Flipkart-Amazon Offer: दिवाळीनिमित्त ऑनलाईन खरेदी करा Gold Coin, या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्तम ऑफर्स उपलब्ध
सर्वत्र धनत्रयोदशीचा उत्सव साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीनिमित्त लोक सोनं खरेदी करतात. आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या किमती तब्बल 3600 रुपयांनी वाढले आहे. भारतात सोन्याची किमतीत सतत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणे ग्राहकांसाठी एक स्वप्न बनलं आहे. मात्र या वाढत्या महागाईत देखील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने एक उत्तम ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ऑनलाइन सोन्याची नाणी खरेदी केल्यास मोठे डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे बचत देखील होईल. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.
आता आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सुरू असलेल्या ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला सोन्याची शुद्धता आणि किमतींची तुलना करून खरेदी करण्याचा निर्णय घेता येईल. आम्ही तुम्हाला 17 ऑक्टोबर रोजी दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ज्वेलरी ब्रँडमधील सोन्याच्या नाण्यांच्या किमतींची तुलना येथे सांगणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अमेजन वर MMTC-PAMP चा 24K (999.9) 8-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,16,630 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर कल्याण ज्वेलर्ससारख्या ठिकाणी 24K (999.9) 10-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,41,014 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये Amazon RBL बँक क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 5% त्वरित सूट (जास्तीत जास्त ₹1,000) समाविष्ट आहे.
फ्लिपकार्ट वर MMTC-PAMP चा 24K (999.9) 8-ग्रॅम सोन्याचा सिक्का 1,14,480 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर PC ज्वेलर्ससारख्या ठिकाणी 24K (995) 10-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,40,492 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 750 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे.
टाटा क्लिक फॅशनवर मुथूट पप्पचन स्वर्णवर्षमचा 24K (999) 10-ग्रॅम सोन्याचे नाणं 1,38,743 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. BOBCARD आणि एक्सिस बँक क्रेडिट कार्ड्सचा वापर करून ग्राहक त्यांच्या खरेदीवर 15 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. दुसरा पर्याय म्हणजे कल्याण ज्वेलर्सचा त्याच शुद्धतेचा 10 ग्रॅम सोन्याचा नाणे 1,39,564 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये कोणत्याही अतिरिक्त ऑफर्स नाहीत.
Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
कॉइनबाजार.इनवर MMTC-PAMP चा 24K (999.9) 5-ग्रॅम सोन्याचे नाणं 73,949 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. इतर पर्यायांमध्ये त्रिभोवनदास भीमजी झवेरी अँड सन्स 24K (999) 10-ग्रॅम सोन्याचे नाणे समाविष्ट आहे ज्याची किंमत 1,44,007 रुपये आहे.
अजियोवर MMTC-PAMP चा 24K (999.9) 10-ग्रॅम सोन्याचे नाणे 1,42,873 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. दुसरा पर्याय म्हणजे पीएन गाडगीळ ज्वेलर्सकडून 1,37,437 रुपयांमध्ये 24K (995) 10 ग्रॅमचे नाणे खरेदी केले जाऊ शकते. सर्व ब्रँड DHANVARSHA2 कोड वापरून 9,999 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या कार्ट किमतीवर अतिरिक्त 2% सूट (₹2,000 पर्यंत) देत आहेत.