Apple WWDC 2026: अवघे काही तास शिल्लक! कधी, कुठे आणि कसा पाहाल अॅपलचा मेगा इव्हेंट? जाणून घ्या सविस्तर
बजेटची चिंता सोडा! दरमहा फक्त 668 रुपये भरून घरी आणा Samsung चा हा 5G स्मार्टफोन… असे आहेत फीचर्स
ॲपल पार्क, क्युपर्टिनो (कॅलिफोर्निया) मधील स्टीव्ह जॉब्स थिएटर येथे अॅपल वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2026 ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटची सुरुवात आज एक खास इन-पर्सन कीनोटने होणार आहे. निवडक डेव्हलपर्स ॲपल पार्कमध्ये उपस्थित राहून ईव्हेंटचा अनुभव घेऊ शकणार आहेत. तर उर्वरित सर्वजण हा ईव्हेंट घरबसल्या पाहू शकणार आहे. या ईव्हेंट लाईव्ह प्रक्षेपण देखील केले जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपल ईव्हेंट 2026 भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता सुरु होणार आहे. यूजर्स हा ईव्हेंट ॲपल टीव्ही ॲप, ॲपल डेव्हलपर ॲप, ॲपल डेव्हलपर वेबसाईट आणि ॲपलच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहू शकणार आहेत. ईव्हेंटमधील किनोटनंतर प्लॅटफॉर्म्स स्टेट ऑफ द युनियन सेशन देखील आयोजित केले जाणार आहे. हे सेशन भारतीय वेळेनुसार रात्री 1:30 वाजता सुरु होणार आहे. यामध्ये टेक कंपनी त्यांच्या नवीन सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म्स आणि डेवलपर टूल्सबाबत सविस्तर माहिती शेअर करणार आहे. जर तुम्ही हा ईव्हेंट लाईव्ह पाहू शकला नाहीत, तर ईव्हेंट संपल्यानंतर याची ऑन-डिमांड रेकॉर्डिंग देखील पाहू शकता. या ईव्हेंटबाबत सर्वात विशेष गोष्ट म्हणजेच, सीईओ म्हणून टिम कुक यांचा हा शेवटचा ईव्हेंट असणार आहे.
कंपनीच्या या बहुप्रतिक्षित ईव्हेंटकडून यूजर्सना बऱ्याच अपेक्षा आहेत. या ईव्हेंटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच कंपनी नवीन अपडेट्स देखील सादर करणार असल्याचे सांगितलं जात आहे. या ईव्हेंटवेळी सर्वांच्या नजरा सिरीच्या एआय वर्जनवर असणार आहेत. आता सिरी केवळ एक असिस्टंट राहणार नाही, तर एका चॅटबोटप्रमाणे काम करणार आहे. तसेच या ईव्हेंटमध्ये आयओएस 27, आयपॅडओएस 27, मॅकओएसची नवीन आवृत्ती, वॉचओएस 27, टीव्हीओएस 27, व्हिजनओएसची नवीन आवृत्ती देखील सादर केली जाण्याची शक्यता आहे.
Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या
WWDC 2026 ईव्हेंटदरम्यान अॅपल 100 हून अधिक टेक्निकल सेशन्स आयोजित करणार आहे. यावेळी डेव्हलपर्सना अॅपल इंजीनियर्स आणि डिजाइनर्ससोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, ग्रुप लॅब्स आणि वन ऑन वन सेशन्स देखील आयोजित केले जाणार आहेत. कंपनी डेव्हलपर्सना नवीन फ्रेमवर्क, टूल्स आणि डॉक्युमेंट्सचा ॲक्सेस देखील उपलब्ध करून देईल.
Ans: आयफोनमध्ये आयओएस, आयपॅडमध्ये आयपॅडओएस आणि मॅक संगणकांमध्ये मॅकओएस वापरले जाते.
Ans: होय, अॅपल आपल्या गोपनीयता आणि सुरक्षा फीचर्ससाठी ओळखली जाते.
Ans: अॅपल वॉच फिटनेस ट्रॅकिंग, आरोग्य मॉनिटरिंग, कॉलिंग आणि नोटिफिकेशनसाठी वापरली जाते.






