Netflix वर येतोय FIFA World Cup लाँच एडीशन गेम! कधी आणि कसा खेळता येणार? जाणून घ्या
नेटफ्लिक्सने ब्रीझीलमध्ये फिफा वर्ल्ड कप: लाँच एडीशनची चाचणी सुरु केली आहे. लाँचिंगवेळी नेटफ्लिक्सची टिव्ही गेमिंग सिरीज 20 देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि मेक्सिको सारख्या देशांचा समावेश असणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, येणाऱ्या काळात हा गेम जास्तीत जास्त देशांमध्ये उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
या गेममध्ये फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये सहभागी होणारे सर्व 48 संघ असणार आहे. प्लेअर्स 16 अधिकृत स्टेडिअममध्ये मॅच खेळू शकणार आहेत. यासोबतच टूर्नामेंटमध्ये सहभागी अललेल्या 1,248 खेळाडूांपैकी त्यांच्या आवडीचा एक खेळाडू निवडून त्याला मैदानात उतरवू शकतील.
नेटफ्लिक्सने हा गेम अतिशय सोप्या पद्धतीने डिझाईन केला आहे. सर्वात आधी सपोर्टेड स्मार्टटिव्हीमध्ये नेटफ्लिक्स गेम्स सेक्शन ओपन करा. यानंतर गेम लाँच झाल्यानंतर स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसणार आहे. हा क्यूआर कोड तुम्हाला स्मार्टफोनने स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा फोन गेमच्या कंट्रोलरमध्ये बदलणार आहे. आता प्लेअर्स त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्वाईप करून पास, शॉट आणि इतर हालचाली कंट्रोल करू शकणार आहेत. नेटफ्लिक्सचं असं म्हणणं आहे की, या गेममध्ये तुमचा स्मार्टफोन कंट्रोलर असणार आहे आणि तुमचा टिव्ही स्टेडिअम. यामुळे कोणत्याही वेगळ्या गेमिंग कन्सोलशिवाय मोठ्या स्क्रीनवर फुटबॉल गेम खेळण्याचा अनुभव मिळेल.
नेटफ्लिक्सने या नव्या गेममध्ये मल्टीप्लेअर सपोर्ट देखील दिला आहे. म्हणजेच एकाच स्क्रीनवर जास्तीत जास्त 4 प्लेअर्स एकत्र मॅच खेळू शकणार आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आणि कुटूंबियांसोबत मिळून गेम खेळण्याचा आनंद घेऊ शकणार आहात. कंपनीचं म्हणणं आहे की, लाँच एडीशन केवळ एक सुरुवात आहे आणि भविष्यात यामध्ये नवीन फीचर्स आणि अपडेट्स जोडले जाणार आहेत.






