हॅकर्सची झोप उडणार! नवं GPT-5.5 सायबर AI मॉडेल लाँचसाठी सज्ज, Sam Altman यांची मोठी घोषणा
सॅम अल्टमॅन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत सायबर डिफेंडर मॉडेल जीपीटी-5.5 सायबर लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी 5 मे रोजी एका खास ईव्हेंटचे आयोजन करणार आहे. ज्याचे नाव GPT-5.5 “पार्टी” असं असणार आहे. या ईव्हेंटमध्ये हे मॉडेल अधिकृतपणे सर्वांसाठी लाँच केले जाऊ शकते, अशी शक्यता आहे. ओपनएआयने सांगितलं आहे की, यूजर्सना साइनअप करून ईव्हेंटमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. अशी आशा आहे की, या ईव्हेंटमध्ये कंपनी जीपीटी-5.5 सायबरबाबतचे काही फीचर्स सांगू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
we’re starting rollout of GPT-5.5-Cyber, a frontier cybersecurity model, to critical cyber defenders in the next few days. we will work with the entire ecosystem and the government to figure out trusted access for cyber; we want to rapidly help secure companies/infrastructure. — Sam Altman (@sama) April 30, 2026
या नव्या मॉडेलबाबत सध्या कंपनीने जास्त माहिती शेअर केली नाही. सॅम अल्टमॅन यांनी अर्ली एक्सेस रोलआउटबाबत सांगितलं आहे की, सायबरसुरक्षेसाठी विश्वसनीय प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण इकोसिस्टम आणि सरकारसोबत मिळून काम करू.
एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सॅम अल्टमॅन यांनी लिहीले आहे की, आम्ही येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या सायबर संरक्षकांसाठी GPT-5.5-सायबर, या अत्याधुनिक सायबर सुरक्षा मॉडेलची अंमलबजावणी सुरू करत आहोत. सायबरसाठी विश्वसनीय प्रवेश निश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण परिसंस्था आणि सरकारसोबत मिळून काम करू; आम्हाला कंपन्या/पायाभूत सुविधांना वेगाने सुरक्षित करण्यास मदत करायची आहे.
Instagram Edits चा धमाका! 1 वर्ष पूर्ण होताच पडणार नव्या फीचर्सचा पाऊस, एडीटींग होणार आणखी मजेदार
ओपनएआईने यापूर्वी जेव्हा GPT-5.4 सायबर मॉडेल लाँच केले होते, त्यावेळी सांगितलं होतं, की संबंधित मॉडेल संबंधित मॉडेल सायबर सिक्योरिटीसाठी डिझाईन करण्यात आले आहे. मालवेअरच्या शक्यता, त्रुटी आणि इतर सुरक्षा यांचा विश्लेषण करण्यासाठी संकलित सॉफ्टवेअरमधील बायनरी रिव्हर्स इंजिनिअरिंग क्षमतेचा वापर करत असे. ओपनएआयने सांगितले की, या मॉडेलच्या चाचणीसाठी सॉफ्टवेअरच्या सोर्स कोडमध्ये प्रवेश करण्याची देखील आवश्यकता नाही.






