ॲपलचा नवीन सिरी मोड नेमका काय? जाणून घ्या सिरी मोडमध्ये होणाऱ्या बदलांचा वापरकर्त्यांना कसा होईल फायदा
हल्ली प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये अँपलचा फोन पाहायला मिळतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच आयफोनची मोठी क्रेझ वाढली आहे. हा फोन केवळ त्याच्या नावामुळे नाहीतर ॲपलच्या लेटस्ट फीचर्स, कॅमेरा आणि सिरी मोडमुळे कायमच चर्चेत असतो. तसेच जगभरात ॲपल वेगाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. अहवालानुसार, लवकरच आयफोनवरील शोध सर्च करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
आगामी iOS 27 अपडेटमध्ये ऍपल कॅमेरा ॲपमध्ये एक नवीन सिरी मोड सादर करू शकते, जो वापरकर्त्यांना रिअल-टाइममध्ये व्हिज्युअल सर्च करण्याची परवानगी देईल, असे सुद्धा अहवालात म्हंटले आहे. हा नवीन मोड फोटो आणि व्हिडिओ यांसारख्या सध्याच्या कॅमेरा पर्यायांसोबत वापरता येईल. आयफोन वापरताना हा मोड चालू केल्यावर, कॅमेऱ्याच्या शटर बटणाच्या जागी एक एआय (AI) आयकॉन दिसेल.यामुळे तुम्ही कॅमेरा कोणत्याही वस्तूवर रोखून प्रश्न विचारू शकता आणि त्याचे लगेच उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल.
आयफोनमधील नवीन फिचर केवळ वस्तू ओळखण्याचीच परवानगी देत नाही, तर संबंधित कामे सोपी करण्यासाठी सुद्धा मदत करते. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे पोस्टर स्कॅन केले, तर ते आपोआप कॅलेंडरमध्ये नोंद तयार करण्याची सूचना यात दिली जाईल. रेस्टॉरंटच्या मेन्यूवर कॅमेरा रोखल्यास, परीक्षणे, रेटिंग्ज आणि इतर तपशील तुम्हाला लगेच मिळवता येईल. यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर अप्सची आवश्यकता भासणार नाही. सध्या सोशल मीडियासह इतर सर्वच ठिकाणी आयफोनची मोठी क्रेझ वाढली आहे.
Zebronics Zeb-PixaPlay 77G स्मार्ट प्रोजेक्टर लाँच; अनेक बेस्ट फीचर्स मिळणार
आयफोनमध्ये करण्यात येणाऱ्या नवीन बदलांमुळे तुमची दैनंदिन कामे देखील सोपी होऊन जातील. खाद्यपदार्थाचे पॅकेज स्कॅन करून त्यातील पौष्टिक घटकांची माहिती मिळवणे, किंवा बिझनेस कार्ड स्कॅन करून थेट संपर्क जतन करणे, सोपे होईल. तथापि, अधिक गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी आयफोन अजूनही ChatGPT सारख्या साधनावर उपलब्ध राहू शकतो. प्रत्येक नवीन लॉंच होणाऱ्या आयफोनमध्ये नवनवीन फीचर्स, लेटेस्ट आयडीयाज आणि टेक्नॉलॉजी आहे. आयफोनमधील बदलण्यात येणाऱ्या सिरी मोडचा सगळ्यांचं खूप जास्त फायदा होईल.






