धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं
भारतात काल धनत्रयोदशीचा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने केली जाते. या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. खरं तर धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी अनेक लोकं सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र अनेक लोकांना शंका असते की ज्वेलर्सकडून खरेदी केलेले सोनं असली आहे का नकली?
भारतात BIS म्हणजेच ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड सोन्याची शुद्धता तपासते आणि आता ग्राहक BIS Care ॲप वरून डिजिटल पद्धतीने सोन्याची शुद्धता तपासू शकतात. त्यामुळे ग्राहक सुनिश्चित करू शकतात की त्यांनी खरेदी केलेलं सोनं खरंच शुद्ध आहे की नाही. भारतात जून 2024 पासून सोन्याचे दागिन्यांवर आणि कलाकृतींसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्याही हॉलमार्क वस्तूवर तीन महत्त्वाच्या खुणा असतात. ज्यामध्ये BIS लोगो, 22K916 सारखे शुद्धता चिन्ह (जिथे 916 91.6% शुद्धता दर्शवते) आणि हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) कोड यांचा समावेश आहे. HUID हा दागिन्यांच्या ऑनलाइन पडताळणीसाठी वापरला जाणारा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक आयडी आहे.
ॲप डाऊनलोड करा – सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ॲप डाऊनलोड करा. तुम्ही गुगल प्ले स्टोर किंवा एप्पल ॲप स्टोअरवरून BIS Care ॲप डाऊनलोड करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करा – ॲप ओपन करा आणि तुमचा मोबाईल नंबर इंटर करून बेसिक रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
Vierfy HUID सिलेक्ट करा – होम स्क्रीनवर Vierfy HUID ऑप्शनवर टॅप करा.
HUID कोड टाका – तुम्ही खरेदी केलेला सोन्याच्या दागिन्यांवर दिसणारा सहा अंकी HUID कोड शोधा आणि तो या ॲपमध्ये टाईप करा.
आता तुम्हाला स्क्रीनवर काही माहिती पाहायला मिळेल. ज्यामध्ये ज्वेलर्सचे नाव आणि रजिस्ट्रेशन, हॉलमार्किंग सेंटरचे नाव, तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूचे प्रकार आणि शुद्धता,
तुम्हाला ॲपमध्ये दिसत असलेली महिती तुम्ही खरेदी केलेले दागिने आणि बिलावर दिलेली माहिती यासोबत जुळत असेल तर तुम्ही खरेदी केलेलं सोनं शुद्ध आहे.
तुम्ही खरेदी केलेली दागिन्यांची माहिती ॲपमध्ये दिसणाऱ्या माहितीशी जुळत नसेल तर तुम्ही ॲपमध्ये कंप्लेंट सेक्शनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल करू शकता.
जर तुम्हाला ॲप डाऊनलोड करायचं नसेल तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर देखील वेरिफिकेशन सर्विसचा लाभ घेऊ शकता. इथे तुम्हाला केवळ सहा अंकी कोड करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ज्वेलरीचे रजिस्ट्रेशन आणि शुद्धतेची डिटेल्स पाहायला मिळतील. ऑनलाइन हॉलमार्क चाचणी फक्त तेव्हाच कार्य करेल जेव्हा दागिन्यांवर HUID असेल आणि ते स्पष्टपणे वाचता येईल. जून 2021 पूर्वी खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये HUID कोड नसू शकतो.