(फोटो सौजन्य: Pinterest)
जिओचा रिचार्ज प्लॅन
जर तुम्ही जिओ नंबर फक्त काॅलिंगसाठी वापरत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे. यात यूजर्सना ४५० रुपयांपेक्षा कमी किमतीत पूर्ण ८४ दिवस अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते. फक्त काॅलिगंसाठी मोबाईलचा वापर करणाऱ्या यूजर्ससाठी ही प्लॅन फायद्याचा ठरु शकतो.
प्लॅनची किंमत
केवळ ४४८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना ८४ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. या प्लॅनमध्ये कोणताही इंटरनेट डेटा मिळत नसला तरी, ४४८ रुपयांमध्ये तुम्हाला दरमहा फक्त १६० रुपये दरात अनलिमिटेड कॉलिंग आणि मेसेजची सुविधा मिळते.
प्लॅनमध्ये काय खास आहे
ज्या यूजर्सना डेटाची आवश्यकता नाहीये त्यांच्यासाठी हा प्लॅन खास असणार आहे. ऑफिसच्या वाय-फायवर जर तुमचं काम भागत असेल आणि घरीही वाय-फाय असेल तर मोबाईलमध्ये डेटाची फार आवश्यकता भासत नाही. अशावेळी जिओचा काॅलिंग रिचार्ज तुमच्या फार कामाचा ठरतो. यात तुम्हाला दरमहा १६० रुपयांपेक्षा कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळते. याचबरोबर अनेकजण एकवेळी फोनमध्ये दोन नंबर्सचा वापर करतात. आता दोन्ही नंबरना चालू ठेवण्यासाठी डेटाच्या रिचार्ज प्लॅनची गरज भासत नाही. अशावेळी एका नंबरवर फक्त काॅलिंग रिचार्ज करुन तुम्ही तुमचे बरेच पैसे वाचवू शकता.
150 हून स्पोर्ट्स मोड आणि अनोखे हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स… नवी Redmi स्मार्टवॉच लाँच, किंमत केवळ इतकी
फायदे
४४८ रुपयांच्या जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससोबतच JioTV आणि JioCloud ॲपचा सपोर्ट दिला जातो. हा प्लॅन केवळ काॅलिगं आणि एसएमएसपुरता मर्यादित नसून JioTV द्वारे यूजर्सना मनोरंजनाचा आणि JioCloud सेवांच्या मदतीने तुमच्या फोनचे स्टोरेज अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्याची सुविधा देखील प्रदान करतो.






