Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या
भारतातील आघाडीची खाजगी टेलिकॉम कंपनी जिओच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 18 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 1.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. 199 रुपयांच्या या जिओ प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये यूजर्स रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. हा प्लॅन खरेदी करण्यासाठी यूजर्सना रोज 11.06 रुपये खर्च करावे लागणार आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या जिओ यूजर्सना जिओटिव्ही आणि जिओ एआय क्लाऊड अॅप्सचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वोडाफोन आइडिया देखील त्यांच्या यूजर्सना 199 रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एकूण 2GB डेटा ऑफर केला जाणार आहे. यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 300 एसएमएस मिळणार आहेत. 199 रुपयांच्या वोडाफोन आइडियाच्या प्लॅनमध्ये यूजर्सना व्हिआय मुव्हिज आणि टिव्हीचे फायदे मिळणार आहेत.
भारतातील दुसरी आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 2GB डेटा मिळणार आहे. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहेत. प्लॅनमध्ये अॅड ऑन बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 4,000 रुपयांच्या किंमतीचा 12 महिन्यांचा अडोब एक्सप्रेस प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळणार आहे. याशिवाय, यूजर्ससाठी एअरटेलचा ‘द सेफ नेटवर्क’ अनुभव, मोफत हॅलोट्यून्स आणि एक्सस्ट्रीम प्लेचे सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.






