काय सांगता! आता YouTube व्हिडीओ शेअर करण्यासाठी WhatsApp ची गरज नाही... नवं फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
यापूर्वी यूजर्सना युट्यूब व्हिडीओ शेअर करण्यासाठी थर्ड पार्टी अॅपवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता असं होणार नाही. आता यूजर्स थेट युट्यूबमधूनच त्यांच्या मित्र आणि कुटंबासोबत व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. तसेच आता युट्यूबवर व्हॉट्सअॅपप्रमाणे चॅटिंग देखील करू शकता. यासाठी डेडिकेटेड मेसेज सेक्शन देखील आहे. या नवीन फीचरचा यूजर्सना कशा पद्धतीने फायदा होणार, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
आतापर्यंत यूजर्सना युट्यूब व्हिडीओ शेअर करण्यासाठीस थर्ड पार्टी अॅपची मदत घ्यावी लागत होती आणि ही संपूर्ण प्रोसेस थोडी मोठी होती. सर्वात आधी व्हिडीओची लिंक कॉपी करा, त्यानंतर मेसेजिंग अॅप ओपन करा, चॅटमध्ये जाऊन व्हिडीओची लिंक पेस्ट करा आणि सेंड करा. मात्र आता ही कटकट संपली आहे. आता यूजर्स युट्यूबच्या बिल्ट-इन मेसेजिंग इंटरफेसद्वारे थेट व्हिडीओ शेअर करू शकणार आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजरला युट्यूब अकाऊंटमध्ये साइन-इन करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूजरचे वय कमीत कमी 18 वर्ष असणं गरजेचं आहे. सेंडरकडे पाठवलेले मेसेज अनसेंड करण्याचा आणि रिसीव्हरकडे मेसेज रिसीव आणि रिजेक्ट करण्याचा पर्याय असणार आहे.
युट्यूबवरील या नवीन फीचरचा वापर करण्याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. सर्वात आधी युट्यूब ओपन करा आणि कोणताही एक व्हिडीओ निवडा. यानंतर व्हिडीओच्या शेअर बटनवर टॅप करा आणि यादीमधील कोणत्याही संपर्काची निवड करा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही कोणत्याही मित्राला चॅटिंगसाठी आमंत्रण देखील पाठवू शकता. एकदा पाठवलेले इन्विटेशन लिंक 7 दिवसांपर्यंत उपलब्ध असेल. 7 दिवसांपर्यंत जर समोरील यूजरने आमंत्रण स्विकारले नाही तर लिंक एक्सपायर होणार आहे. यानंतर तुम्हाला लिंक पुन्हा एकदा पाठवावी लागणार आहे. याशिवाय, यूजर्सना मेसेज सेक्शनमध्ये नवीन संभाषण सुरु करण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.






