Redmi K90 Pro Max: 23 ऑक्टोबरला लाँच होणार Redmi चा हा नवीन स्मार्टफोन, डेनिम टेक्सचरवाला पॅनलने असणार सुसज्ज
Redmi K90 Pro Max हा स्मार्टफोन 23 ऑक्टोबर रोजी लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनचे लॉचिंग चीनमध्ये होणार आहे. कंपनीने त्यांच्या अपकमिंग K सिरीज स्मार्टफोनचे डिझाईन रिलीज केले आहे. Redmi K90 Pro Max या कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा युनिट दिला जाण्याची शक्यता आहे. रिलीज करण्यात आलेले डिझाईन बघून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, अपकमिंग स्मार्टफोनमध्ये Bose द्वारे ट्यून करण्यात आलेले स्पीकर असतील आणि याचा एक कलर व्हेरियंट डेनिमसारख्या टेक्सचरवाल्या रियल पॅनलसह लाँच केला जाऊ शकतो.
Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
Redmi ने जारी केलेल्या टीझरवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, Redmi K90 Pro Max डुअल-टोन टेक्सचर्ड डेनिम ब्लू फिनि मध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये सिल्वर रंगाचे मिडल प्रेम आणि कॅमेरा आयलँड असणार आहे. फोनमध्ये नॅनो लेबलचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे या स्मार्टफोनची मजबुती अधिक वाढली आहे. हा स्मार्टफोन UV किरण, पिवळा पडणे आणि घाणीपासून वाचणार आहे. हे डिवाइस फ्लोइंग गोल्ड व्हाइट कलर व्हेरिअंटमध्ये देखील उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
पुढील बाजूला, Redmi K90 Pro Max मध्ये सेंटर-अलाइन होल पंच कटआउट दिला जाणार आहे. ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असेल आणि डिस्प्लेमध्ये अत्यंत पातळ आणि युनिफॉर्म बेजल्स असतील. या अपकमिंग स्मार्टफोनच्या मागील बाजूस रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल दिला जाणार आहे. ज्यामध्ये चार सर्कुलर ओपनिंग्स 2×2 ग्रिड असणार आहे. यामध्ये तीन कॅमेरा लेन्स आहेत, ज्यामध्ये एक पेरिस्कोप सेंसर देखील समाविष्ट आहे. तर चौथा कॅमेरा एखादा दुसरा सेंसर असू शकतो. या कॅमेरा युनिटमध्ये एलईडी फ्लॅश देण्यात आली आहे.
मुख्य कॅमेरा मॉडेलच्या बाजूला एक वेगळा सर्क्युलर कट आउट आहे. ज्यावर ‘Sound by Bose’ असे लिहिण्यात आलं आहे. यामुळे हे स्पष्ट होतं की Redmi आणि Bose यांच्यामध्ये ऑडिओ ट्यूनिंगसाठी कोलॅबोरेशन करण्यात आला आहे. ज्यामुळे Redmi K90 Pro Max मध्ये साउंड क्वालिटी अधिक चांगली असणार आहे. फोनच्या डाव्या बाजूला वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दिल जाणार आहे.
कंपनीने पुष्टी केली आहे की, Redmi K90 Pro Max हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनची लॉचिंग 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार 4.30 वाजता) होणार आहे. या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. या आगामी स्मार्टफोनच्या लॉचिंगसाठी सर्वजण अत्यंत उत्सुक आहेत. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.