8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क
शाओमी 17 मॅक्स स्मार्टफोन कंपनीने 12GB + 256GB, 16GB+256GB, 12GB + 512GB आणि 16GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 68,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,099 म्हणजेच सुमारे 72,000 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,399 म्हणजेच सुमारे 76,000 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल असलेल्या 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,799 म्हणजेच सुमारे 82,000 रुपये आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. 25 मे पासून शाओमी ऑनलाईन स्टोअरवर या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन पिक्सल ब्लॅक, स्काय ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Xiaomi)
नवा स्मार्टफोन एक डुअल सिम हँडसेट आहे, जो शाओमीच्या अँड्रॉईड 16-बेस्ड HyperOS 3 वर चालतो. या फोनमध्ये 6.9-इंच1.5K (1,200×2,608 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 300Hz टच सँपलिंग रेट, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, HDR10+ सपोर्ट, एचडीआर व्हिव्हिड, डॉल्बी व्हिजन आणि ड्रॅगन क्रिस्टल 3.0 प्रोटेक्शन दिले आहे. कंपनीने दावा केला आहे की, या डिव्हाईसमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 रेटिंग दिली आहे.
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 एलीट जेन 5 चिपसेट दिला आहे, जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 4.6GHz ची पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या फोनमध्ये अॅड्रेनो जीपीयू, क्वालकॉम एआय इंजिन, 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील दिले आहे. सुरक्षेसाठी नव्या फोनमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे.
फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, शाओमी 17 मॅक्समध्ये Leica-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिले आहे, ज्यामध्ये सॅमसंग HP9 सेंसर, 23mm फोकल लेंथ आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 200-मेगापिक्सेल (f/1.65) चा प्राइमरी शूटर दिला आहे. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.4) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील आहे, जो 3x पर्यंत ऑप्टिकल झूम ऑफर करतो. यासोबतच फोनमध्ये 50-मेगापिक्सेल (f/2.4) चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील दिला आहे, जो 102-डिग्रीचा फील्ड ऑफ व्यू देतो. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तो 4K/30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो.
नव्या डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, क्यूजेडएसएस आणि NavIC चा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, IR ब्लास्टर, कलर टेम्परेचर सेंसर, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, ई-कम्पास आणि बैरोमीटर सारखे सेंसर देण्यात आले आहेत.






