Redmi Note 14 Pro सीरीजचे नवे व्हेरिअंट्स लाँच, आकर्षक रंगासह भारतात केली एंट्री; वाचा स्पेसिफिकेशन्स
Redmi ने भारतात Redmi Note 14 Pro सिरीजमधील दोन स्मार्टफोनचे नवे कलर व्हेरिअंट लाँच केले आहेत. कंपनीने Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन शँपेन गोल्ड कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केले आहेत. Redmi Note 14 Pro 5G सीरीज गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच करण्यात आली होती.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…
Redmi Note 14 Pro 5G या सिरीजमधील स्मार्टफोन स्पेक्टर ब्लू, फँटम पर्पल आणि टाइटन ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आता यामध्ये आणखी एक नवीन कलर ऑप्शन जोडण्यात आला आहे. नव्या रंगाशिवाय, या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. Redmi Note 14 Pro 5G स्मार्टफोन MediaTek Dimensity 7300-Ultra प्रोसेसरवर आधारित आहे, तर Redmi Note 14 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro 5G स्मार्टफोन भारतात शँपेन गोल्ड या नव्या कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, Mi.com वेबसाइट आणि ऑथराइज्ड Xiaomi रिटेल स्टोर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. Redmi Note 14 Pro+ 5G च्या शँपेन गोल्ड व्हेरिअंटची किंमत 8GB रॅम+ 128GB स्टोरेजसाठी 27,999 रुपये, 8GB रॅम+ 256GB स्टोरेजसाठी किंमत 29,999 रुपये आणि 12GB रॅम+ 512GB स्टोरेजसाठी किंमत 32,999 रुपये आहे. तर, Redmi Note 14 Pro 5G स्मार्टफोनच्या शँपेन गोल्ड व्हेरिअंटची किंमत 8GB रॅम+ 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये आणि 8GB रॅम+ 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 24,999 रुपये आहे. Redmi निवडक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सच्या खरेदीवर 1,000 रुपयांचं इंस्टंट बँक डिस्काउंट देखील देत आहे. यासोबतच, नऊ महीन्यापर्यंत नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे.
Redmi Note 14 Pro+ 5G आणि Redmi Note 14 Pro स्मार्टफोन्स 5G Android 15-बेस्ड Xiaomi HyperOS 2 वर आधारित आहेत. या स्मार्टफोन्समध्ये चार वर्षांपर्यंतचे सॉफ्टवेयर अपडेट्स दिले जाणार आहेत. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच 1.5K (1,220×2,712 पिक्सेल्स) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 3,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आहे. Redmi Note 14 Pro+ 5G मध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट आहे, तर Redmi Note 14 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर देण्यात आला आहे.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये IP68-रेटेड बिल्ड आहे आणि रियरमध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसरसह ट्रिपल कॅमेरा यूनिट्स आहेत. Redmi Note 14 Pro+ 5G मध्ये 50MP लाइट फ्यूजन 800 सेंसर (OIS सह), 8MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP 2.5x टेलीफोटो लेंस आहेत. Note 14 Pro 5G मध्ये 50MP Sony LYT-600 सेंसर (OIS सह), 8MP अल्ट्रा-वाइड आणि 2MP मॅक्रो लेंस देण्यात आले आहेत. दोन्ही फोनमध्ये 20-मेगापिक्सल सेल्फी शूटर आहे.
Redmi Note 14 Pro+ 5G मध्ये 6,200mAh बॅटरी आहे, जी 90W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Note 14 Pro 5G मध्ये 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.