Rhythm Echo: 50 तास ऐका नॉनस्टॉप म्युझिक, हे ईअरबड्स ठरणार गेम चेंजर! किंंमत तुमच्या बजेटमध्ये
itel ने त्यांच्या प्रोडक्ट पोर्टफोलियो आता आणखी एका नवीन डिव्हाईसचा समावेश केला आहे. हे डिव्हाईस विशेषत: अशा लोकांसाठी लाँच करण्यात आलं आहे, ज्यांना गाणी ऐकण्याची आवड आहे. itel ने त्यांच्या युजर्ससाठी नवीन ईअरबड्स लाँच केले आहेत. हे नवीन ईअरबड्स Rhythm Echo या नावाने लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसचा प्लेटाईम 50 तासांचा आहे, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये Quad Mic ENC सह क्लियर कॉलिंग आणि इमर्सिव साउंड क्वालिटी देखील ऑफर केली जात आहे. या डिव्हाईसची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे.
धनत्रयोदशीला खरेदी केलेले सोनं खरं की बनावट? आता 2 मिनिटांत ऑनलाइन तपासा, जाणून घ्या कसं
itel Rhythm Echo या नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ईअरबड्सची किंमत 1,199 ठेवण्यात आली आहे. Rhythm Echo ईयरबड्स भारतात रिटेल स्टोर्सद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. यात ट्रेंडी वक्र डिझाइन, कॉम्पॅक्ट चार्जिंग केस आहे. हे डिव्हाईस दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये ल्युरेक्स ब्लॅक आणि मिडनाईट ब्लू यांचा समावेश आहे. वापरकर्त्यांना या उत्पादनावर 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळते. (फोटो सौजन्य – X)
गेमर्ससाठी, itel Rhythm Echo या ईयरबड्समध्ये 45 मिलीसेकंडची लो लेटेंसी देण्यात आली आहे. ज्यामुळे स्मूद ऑडियो-विजुअल सिंक आणि फास्ट रिस्पॉन्स टाइम ऑफर केला जातो. 10mm डायनामिक ड्राइवर्स म्यूझिक, चित्रपट आणि कॉल्समध्ये क्लियर आणि बैलेंस्ड साउंड डिलीवर केला जातो. Bluetooth 5.3 सपोर्टसह यूजर्सना स्टेबल कनेक्शन आणि पावर-एफिशिएंट परफॉर्मेंस ऑफर केला जातो. तर टच कंट्रोल्सने ते अगदी सहज ट्रॅक बदलू शकतात, आवाज एडजस्ट करू शकतात किंवा कॉल रिसीव्ह करू शकतात.
या डिव्हाईसची चार्जिंग देखील अत्यंत फास्ट आणि एफिशिएंट आहे. हे डिव्हाईस केवळ 10 मिनिटांच्या चार्जने 2 तासांचा प्लेबॅक टाईम ऑफर करतो, ज्यामुळे डाउनटाइम कमी राहतो. हे ईयरबड्स IPX4 वॉटर रेजिस्टेंट आहे, ज्यामुळे ते वर्कआउट किंवा आउटडोर वापरासाठी देखील वापरले जाऊ शकतात. इतर फीचर्सचा विचार केला तर या ईअरबड्समध्ये AI वॉयस असिस्टेंट सपोर्ट, Type-C चार्जिंग आणि कम्फर्ट-फिट ईयर टिप्स यांचा समावेश आहे, जे दिर्घकाळ ऐकण्यासाठी आरामदायक अनुभव देतात. itel चे भारतात 11 कोटींहून अधिक ग्राहक आहेत आणि 1,000 हून अधिक सेवा केंद्रांचे नेटवर्क आहे.
itel इंडियाचेके CEO अरिजीत तलपत्रा यांनी सांगितलं आहे की, हे लाँच कंपनीचे विश्वासार्ह आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचे प्रतिबिंब आहे. ते पुढे म्हणाले, “Rhythm Echo सह, आम्ही आधुनिक यूजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन, सहनशक्ती आणि स्पष्टतेचे परिपूर्ण संयोजन सादर केले आहे.”