Xiaomi, Redmi स्मार्टफोनच्या किंमती वाढण्याची शक्यता; यूजर्सवर होणार थेट परिणाम, मोजावे लागणार जास्तीचे पैसे
यापूर्वी देखील कंपनीने त्यांच्या काही बजेट फ्रेंडली स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंपनीने हा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. याबाबत टिप्स्टर अभिषेक यादवने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, शाओमी 17T, रेडमी नोट 15, रेडमी 15A आणि रेडमी 15C च्या किंमतीत 5 हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते. (फोटो सौजन्य: Pinterest)
कंपनीने हा फ्लॅगशिप स्मार्टफोन 12GB+ 256GB आणि 12GB + 512GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. 12GB+ 256GB व्हेरिअंटची लाँच किंमत 59,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 64,999 रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे. तसेच 12GB + 512GB हे टॉप व्हेरिअंट 64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 69,999 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच कंपनी या स्मार्टफोन व्हेरिअंटच्या किंमतीत 5 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे.
या मिड रेंज स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट 26,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 28,999 रुपये मोजावे लागू शकतात. तर 8GB + 256GB ची लाँच किंमत 29,999 रुपये होती. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 31,999 रुपये खर्च करावे लागू शकतात. म्हणजेच कंपनी या स्मार्टफोनच्या किंमतीत 2 हजार रुपयांपर्यंत वाढ करू शकते.
रेडमी 15 सिरीजच्या किंमतीत देखील कंपनी वाढ करू शकते. ही स्मार्टफोन सिरीज 14,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. मात्र कंपनीच्या निर्णयानंतर ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच कंपनी या सिरीजच्या किंमतीत 1 हजार ते 1500 रुपयांपर्यंत वाढ करू शकते.
Xiaomi is increasing smartphone prices in India from tomorrow. If you’re planning to buy any of these phones, today is the last day to get them at the current price on online platforms before the revised pricing takes effect. Price hike:
Redmi 15A 5G: up to ₹1,500
Redmi 15C… pic.twitter.com/b6I4t2BCp9 — Abhishek Yadav (@yabhishekhd) July 26, 2026
6GB + 128GB व्हेरिअंट 20,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 21,499 रुपये खर्च करावे लागू शकतात. 8GB + 128GB व्हेरिअंट 22,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 23,499 रुपये मोजावे लागू शकतात. 8GB + 256GB व्हेरिअंट 24,499 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 25,499 रुपये खर्च करावे लागू शकतात.
4GB + 128GB व्हेरिअंट 16,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 18,499 रुपये खर्च करावे लागू शकतात. 6GB + 128GB व्हेरिअंट 18,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 20,499 रुपये खर्च करावे लागू शकतात. 8GB + 128GB व्हेरिअंट 20,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 22,499 रुपये खर्च करावे लागू शकतात.
4GB + 64GB व्हेरिअंट 14,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 15,999 रुपये मोजावे लागू शकतात. 4GB + 128GB व्हेरिअंट 15,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 17,499 रुपये मोजावे लागू शकतात. 6GB + 128GB व्हेरिअंट 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. मात्र आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 19,499 रुपये मोजावे लागू शकतात.






