Vivo X300: फ्रेश लुक, स्मार्ट फीचर्स आणि दमदार स्पीड! विवोच्या दोन 5G स्मार्टफोन्सची धमाकेदार एंट्री, किंमत वाचून धक्का बसेल
डिव्हाईसच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर भारतात लाँच करण्यात आलेल्या Vivo X300 सीरीजमध्ये 3nm MediaTek Dimensity 9500 चिपसेट देण्यात आली आहे. यासोबतच फोनमध्ये Pro Imaging VS1 चिप देखील आहे. डिव्हाईसमध्ये V3+ इमेजिंग चिप देखील आहे. यासोबतच या फ्लॅगशिप डिव्हाईसमध्ये Android 16-बेस्ड OriginOS 6 दिला आहे. (फोटो सौजन्य – X)
Vivo X300 Pro launched in India.
Price 💰 ₹1,09,999 (16GB+512GB) #vivoX300pro Specifications
📱 6.78″ 2K flat 8T LTPO BOE Q10+ display, 1800nits HBM, 120Hz refresh rate
🔳 MediaTek Dimensity 9500
LPDDR5x RAM and UFS 4.1 storage
🎮 Mali-G1-Ultra MC12 GPU
🍭 Android 16 Origin OS… pic.twitter.com/aeVjWX2psQ — Abhishek Yadav (@yabhishekhd) December 2, 2025
वीवो X300 प्रोमध्ये 6.78-इंच 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 94.85 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आहे. या डिव्हाईसचा डिस्प्ले HDR10+ कंटेंटला सपोर्ट करतो आणि यामध्ये SGS लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन आणि TUV रीनलँड फ्लिकर-फ्री सर्टिफिकेशन देखील आहे. नॉन प्रो Vivo X300 मध्ये 6.31-इंच 1.5K AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 300Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि HDR सपोर्ट दिला आहे. या हँडसेटमध्ये 16GB पर्यंत LPDDR5x Ultra रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo X300 Pro मध्ये Zeiss-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.57) Sony LYT-828 प्रायमरी कॅमेरा, 50-मेगापिक्सेल (f/2.0) Samsung JN1 अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.67) HPB APO टेलीफोटो लेंस दिली आहे. डिव्हाईसच्या समोरील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.0) Samsung JN1 सेल्फी कॅमेरा दिला आहे.
डिव्हाईसच्या स्टँडर्ड, X300 मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 200-मेगापिक्सेल HPB प्राइमरी कॅमेरा, OIS सह 50-मेगापिक्सेल (f/2.57) सोनी LYT-602 टेलीफोटो लेंस आणि 50-मेगापिक्सेल (f/2.0) सँमसंग JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे.
वीवो X300 प्रो ची किंमत 1,09,999 रुपये आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या सिंगल 16GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. हा स्मार्टफोन ड्यून गोल्ड आणि एलीट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. Vivo X300 स्मार्टफोनच्या 12GB + 256GB ऑप्शनची किंमत 75,999 रुपये आहे. 12GB + 512GB या व्हेरिअंटची किंमत 81,999 रुपये आणि 16GB + 512GB या व्हेरिअंटची किंमत 85,999 रुपये आहे. हे डिव्हाईस एलीट ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि समिट रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Ans: Vivo फोन कॅमेरा क्वालिटी, सेल्फी परफॉर्मन्स आणि आकर्षक डिझाइनसाठी ओळखले जातात.
Ans: Vivo V-Series (सेल्फीसाठी), X-Series (कॅमेरा/फ्लॅगशिप), आणि Y-Series (बजेट) सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
Ans: होय, विशेषतः Vivo च्या X-Series आणि V-Series मध्ये मजबूत प्रोसेसर आणि गेम बूस्टर फीचर्स दिले जातात, जे गेमिंगसाठी उपयुक्त असतात.






