भारत अन् श्रीलंका सिरिज (फोटो- सोशल मीडिया)
भारत अन् श्रीलंकेमध्ये दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या सिरिजमधला पहिला सामना 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाणार आहे. गॉल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. तर दूसरा सामना हा 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाणार आहे. जे कोलंबो येथे होणार आहे. यामध्ये भारत अन् श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी 20 सामने खेळवले जाणार नाहीयेत.
स्टंप चार वेळा हवेत फिरला अन्…! Ashok Sharma चा फास्ट बॉल अन् थेट विकेट; पहा Viral Video
भारत अन् श्रीलंकेमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांसाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. भारतीय संघ नुकताच अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. मात्र त्याचा समावेश वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत नव्हता. त्यामुळे भारताने सामना जिंकला असला तरी त्यांना पॉईंट्स टेबलमध्ये काही फायदा मिळाला नाही.
भारत श्रीलंका सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे. इथे जिंकणाऱ्या संघाला थेट पॉईंट्स मिळणार असून त्याच्या पीसीटीमध्ये देखल सुधारणा होणार आहे. WTC फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला आपल्या PCT मध्ये वाढ करणे अनिवार्य आहे. सध्या भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेचा संघ सहाव्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्यासाठी पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर असणे आवश्यक असते. त्यामुळे दोन्ही संघ सामने जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहेत. बीसीसीआय लवकरच टेस्ट सिरिजसाठी संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
‘Vaibhav Suryavanshi ने आपल्या फिटनेसवर…’; कोच व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मोठे विधान






