देशात अनेक राज्यांत पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
आज अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा
अनेक राज्यांमध्ये गुलाबी थंडी पडण्याची शक्यता
अनेक राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी
India Rain Alert: देशभरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ निर्माण झाले आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा तर अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
अनेक राज्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या खंडित तयार होणाऱ्या चक्रीवादळ अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पूर्वोत्तर मान्सून सुरू होतो की काय असा प्रश्न उपस्थित हॉट आहे.
या चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि ओडिशा राज्यात पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीवरील राज्यांमध्ये 100 ते 150 मीमी पावसाची शक्यता आहे. अनेक राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तर भारतात थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे.
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये हवेत गारवा आला आहे. तापमानात घट झाली आहे. भारतीय हवामान विभगाच्या माहितीनुसार, नागालँड, मणीपुर, मिजोराम, त्रिपुरा राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो.
पावसाला करा बाय-बाय!
यंदा मान्सून लांबल्याचे दिसून आले. मे महिन्यातच सुरू झालेला पाऊस आता सर्वांची रजा घेणार आहे. येत्या दोन चार दिवसांमध्ये पाऊस माघारी परतणार आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस सुरू होता. अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पावसाचा मुक्काम लांबला. पुढील दोन ते चार दिवसांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
राज्यातून लवकरच मान्सून माघारी जाणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळामुळे पाऊस लांबला. विविध भागातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रातून पाऊस कमी होत आहे. गेले काही दिवस पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे.
Maharashtra Rain Update: पावसाला करा बाय-बाय! येत्या दोन दिवसांत…; IMD चा अलर्ट काय?
सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाने राज्यात कहर केला होता. सोलापूर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टी झाली होती. जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. बळिराजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या काही भागात ऑक्टोबर हीटचा देखील त्रास जाणवू लागला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला नाहीये. हवामान मोकळे राहण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.