भिवंडीत गणेशोत्सव मंडळांचा सन्मान समारंभ ओसवाल कॉलेज ऑडिटोरीयम हॉल, अंजूर फाटा येथे पार पडला. पोलिस आयुक्त ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विविध मंडळांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाला अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धामणकर नाका मित्र मंडळाने पहिला क्रमांक पटकावला, तर बाळ गोपाळ मित्र मंडळ व स्वामी समर्थ मंडळाने द्वितीय क्रमांक मिळवला.