महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात झालीय.. लातूर जिल्ह्यातील १५२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येत असून, या परीक्षेला जिल्ह्यातील ६८२ विद्यालयातील एकूण ३९ हजार १२४ विद्यार्थी सामोरे जात आहेत. या परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी लातूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने प्रत्येक केंद्रावर भरारी पथके आणि बैठे पथकांबरोबरच सीसीटीव्हीची सोय करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी दीडशे बैठे पथके आणि ११० भरारी पथकांची नियुक्ती शिक्षण विभागाकडून करण्यात आलीय. दरम्यान, या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणात व्हावी यासाठी पोलीस दलाच्या वतीने ही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जिल्ह्यातील १५२ परीक्षा केंद्रांवर जवळपास १ हजार ३६० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. यात ११९ पोलीस अधिकारी, अडीचशे पोलीस अंमलदार, ९०० पुरुष होमगार्ड आणि शंभर महिला होमगार्ड यांचा समावेश आहे.