नागपुरात अलीकडे घडलेल्या हिंसाचारामुळे शहरातील काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महाल, इतवारी, गांधीबाग, सराफा मार्केट यासारखी नागपुरातील प्रमुख व्यापारी ठिकाणं बंद राहिली आहेत. परिणामी छोट्या दुकानदारांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांचाच व्यवसाय ठप्प झाला आहे. रोजच्या व्यवहारावर याचा मोठा परिणाम झाला असून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात गेले आहे. नवराष्ट्रने या भागातील स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करत त्यांचे मत जाणून घेतले. त्यांच्या अडचणी, भावना आणि सरकारकडून असलेल्या अपेक्षा त्यांनी मोकळेपणाने मांडल्या.