Sangli : पत्रकार पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरील हल्ल्याविरोधात विटा शहरात मोर्चा
विटा शहरांमधील स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर त्यांच्या कार्यालयात घुसून कोयता आणि लोखंडी रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा निषेध आणि संबंधित दोघा आरोपींवर आणि त्यांना हल्ला करण्यास भाग पाडणाऱ्या मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करावी,यासाठी आज जिल्ह्यातील पत्रकारांनी विटा पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.