(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
सदर घटना ही आग्रा येथून समोर येत आहे. पत्नीला माहिती मिळाली की, पती त्याच्या प्रेसयीसोबत एका हाॅटेलमध्ये थांबला आहे ज्यानंतर तिने दोघांना एक अनोखं सरप्राईज देण्याचा प्लॅन केला. पत्नीने गुपचूप जाऊन दोघांना रंगेहात पकडलं आणि हाॅटेलबाहेरच प्रेयसीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीचा राग इतका वाढला होता की ती कुणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसा, ताजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीडीआय मॉलच्या मागे असलेल्या एका हॉटेलबाहेर रस्त्याच्या मधोमध हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला. पत्नीने पतीला आणि प्रेयसीला एकत्र पाहताच तिचा राग अनावर झाला आणि शिवीगाळ करतच तिने प्रेसयीला मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीने प्रेयसीचे केल पकडले, तिला जमिनीवर लोळवले आणि मग लाथा-बुक्क्यांनी तिला मारायला सुरुवात केली. यादरम्यान पतीने दोघींना वेगळे करण्याचा प्रयत्न केला पण पत्नी काही तिला सोडायला तयार नव्हती. हा ड्रामा पाहण्यासाठी हाॅटेल बाहेर लोकांचा जमाव तयार झाला ज्यानंतर कसंबसं नवऱ्याने पत्नीला वेगळं केलं आणि प्रेयसीला गाडीतून घरी पाठवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.
आगरा में एक शादीसुदा व्यक्ति अपनी प्रेमिका के साथ स्कूटी से घूम रहे थे। एक होटल में जाकर रुक गए। ये इनपुट व्यक्ति कि पत्नी को मिल गया। वह पहुंच गई। मारधाड़ शुरू हो गई। व्यक्ति किसी तरह से प्रेमिका को लेकर भागने की कोशिश में था लेकिन पत्नी का गुस्सा सातवें आसमान पर था, इसके चलते… pic.twitter.com/Ehv2FaMgcq — Rajesh Sahu (@askrajeshsahu) June 1, 2026
घटनेचा व्हिडिओ @askrajeshsahu नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची माहिती देण्यात आली असून यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “एका बाजूला उभा असलेला भाऊ आणि व्हिडिओ बनवणारी व्यक्ती या संपूर्ण नाटकाचा आनंद घेत आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आग्रामधील हे प्रकरण नात्यांमधील विश्वासाचे महत्त्व आणि तो तुटल्यास होणारे परिणाम अधोरेखित करते. राग आणि हिंसाचारामुळे परिस्थिती आणखी चिघळते, अशा परिस्थितीत संयम आणि समजूतदारपणा हाच सर्वोत्तम मार्ग आहे.” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “असं वाटतंय की, खूप मोठा मॅटर झाला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






