गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्..., पुढे जे घडलं, Video Viral
कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, हत्ती रस्त्यावरुन निवांत चालत आहे. याच वेळी मागून एक बाइकस्वार वेगाने येत आहे. दुचाकीस्वार हत्तीच्या पुढे जाण्याचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ही गोष्टी गजराजाला आवडत नाही. काही क्षणांतच गजराज संतापतो आणि मोठ्याने आवाज करत दुचाकीस्वाराच्या दिशेने धाव घेतले. हत्ती धावत येत असल्याचे पाहताच तरुण घाबरतो आणि बाईक तिथेच सोडून आपला जीव वाचवण्यासाठी धावत सुटतो. सध्या या घटनेची व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
An elephant was walking right in the middle of the road in a forest area, effectively blocking it. Even then, a sports bike rider, trying to act smart, attempted to squeeze past the elephant from the side. He didn’t wait even a little for the elephant to move away. The elephant… pic.twitter.com/OyQJYczwHy — Saffron Chargers (@SaffronChargers) June 5, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SaffronChargers या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी जंगलाच्या ठिकाणी घाई करणे चांगले नाही असे म्हटले आहे. काहींनी तरुणाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. परंतु अद्याप ही घटना कुठे घडली हे अद्याप समजलेले नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






